"गडकिल्ल्यांचे स्थापत्य: भारतवर्षाची प्राचिन परंपरा"
भाग 3
पोस्टसांभार : श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
**कौटिल्य अर्थशास्त्रीय ग्रंथातील पुरावे*
इसवी सन पूर्व 327 च्या आसपास सम्राट चंद्रगुप्ताचे राज्य समस्त आर्यावर्तावर म्हणजेच भारतवर्षावर होते . चंद्रगुप्ताच्या पदरी असलेले महागुरू चाणक्यांनी निर्मिलेल्या अर्थशास्त्रीय ग्रंथात दुर्गांसंबंधी अनेक पुरावे सापडतात. यांत राजाने दुर्गाची रचना करताना नगराच्या किंवा प्रदेशाच्या चारही बाजूला नैसर्गिक भूरचनेचा फायदा घेऊन युद्धाला उपयोगी पडतील अशा दुर्गांची रचना करावी असे सुचवले जाते. वरील ग्रंथांमध्ये दुर्गांचे आठ प्रकार सांगितले आहेत-
1) जलवेष्ठित किंवा चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला किल्ला.
2) खंदकाने वेढलेला किल्ला.
3) डोंगरावर दगडी बांधकामात बांधलेला किल्ला.
4) खोदलेले किंवा विशिष्ट प्रकारे खोदून बांधकाम केलेला किल्ला.
5) निर्जल प्रदेशात बांधलेला किल्ला.
6) दलदलीने भरलेल्या किंवा ओसाड प्रदेशात बांधलेला किल्ला.
7) कुसळाच्या गवताने व्यापलेला किल्ला .
8)काटेरी वेलींनी वेढलेला किल्ला.
गुप्तवंशीय सम्राट चंद्रगुप्त यांच्या दरबारात आलेल्या मॅगेस्थ्यानियनने किल्ल्यात वसलेले पाटलीपुत्र शहर ज्यावेळी पाहिले त्याचे खूपच सुरेख वर्णन केले आहे.तो म्हणतो, "गंगेच्या तीरावर एक खूपच सुंदर अभेद्य शहर वसलेले आहे त्याच्या तटाची लांबी नऊ मैल तर रुंदी दीड मैल आहे, त्यात चौसष्ठ वेशी आणि 570 बुरुंज आहेत. पूर्ण तटाला खंदकाचा वेढा आहे ज्यात गंगेचं पाणी फिरवले आहे .तसेच शहरांमधील घरांची उंची दोन मजली तीन मजली लाकडी आहेत.आणि त्या घरांना आग लागू नये म्हणून विशेष काळजी घेतली आहे.राजवाडा हा किल्ल्याच्या मधोमध आहे आणि तो रत्नखचित सुवर्णाने मढविला आहे."
No comments:
Post a Comment