Followers

Monday, 18 May 2020

किल्ले संतोषगड

वैभव महाराष्ट्राचे!

फलटण - सातारा महामार्गावर मोळ घाटाजवळ संतोषगड उर्फ ताथवडा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ९०६ मी. उंचीचा हा गिरीदुर्ग शंभु महादेव रांगेवर असून याची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. पायथ्याशी असलेल्‍या ताथवडा गावात प्रशस्त महादेव मंदिर अाहे.

ताथवडा गावातून सोप्या वाटेने गड चढाई करताना निम्म्यावर तीन गुहा आणी एक मठ आहे. गुहेत एक मुर्ती असून ती वाल्मिकी ऋषींची आहे असे मानतात. मठात महिषासुरमर्दिनीची सुबक मुर्ती आसून जवळच मोठ्या गुहेत शंभु महादेवाची पिंड आणी पाणी आहे. मठाच्यावर गडाची तटबंदी आहे. पडक्या दरवाजातून गडप्रवेश करून संतोषगडाच्या माचीवर जाता येते. माचीवरून एका प्रचंड कातळाच्या आडोशाने तटबंदी बुरूज रचलेला सुरक्षित बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ छोटी गुहा आहे, तसेच पडके वाडे, धान्य कोठार, पाणी टाकी, मारूती मंदिर, प्रशस्त टाक्यात एका भिंतीवर बांधलेले तातोबा महादेव मंदिर, अभेद्य बुरूज हे अवशेष पहायला मिळतात.

किल्ले संतोषगड, ता. फलटण, जि. सातारा

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment