Followers

Sunday, 17 May 2020

किल्ले भवनीगड,

वैभव महाराष्ट्राचे!

पनवेल गोवा महामार्गावर चिपळूण आणी संगमेश्वरच्या दरम्यान तुरळ गाव आहे. तुरळ गावापासून डाविकडे वळल्यावर कडवईला रोड जातो. कडवई हे वनदुर्ग असलेल्या भवानीगडाच्या पायथ्याचे गाव आहे. गोवा महामार्ग सोडल्यावर लगेच कोकण रेल्वेचा ब्रिज लागतो. त्या ब्रिजवरून उजवीकडे साधारण समुद्रसपाटीपासून ४०० मीटर उंचीवर, दाट झाडीने वेढलेला भवानीगड दिसतो. कडवईत पोहचल्यावर गावा पुढील नदीवरचा पुल ओलांडला की लगेच उजवीकडे रोड जातो. त्या रोडने पुढे गेल्यावर म्हादगेवाडी लागते. वाडीतून डावीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने जायचे, रोड कच्चा असला तरी गाडी जाते. तसेच पुढे गेल्यावर प्रथमतः गोसावीवाडी लागते. तेथून पुढे गेल्यावर शिर्के वाडी लागते. शिर्के वाडी पर्यत गाडी जाते. येथे रोडच्या कडेलाच गाडी लावून सिमेंटनी बनविलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने गड भटकंतीस निघावे.

भवानीगडाचा कातळ समोर आल्यावर डावीकडील वाट पाण्याच्या टाक्यान कडे जाते. एकूण सहा टाकी आहेत, त्यातली दोन बुजलेली असून दोन भुयारी टाकी आहेत. त्यातील एका भुयारी टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ते पाहून आल्या पावली माघारी फिरून पुन्हां पायऱ्यांनी बालेकिल्याच्या दिशेने निघावे. दगडी चिरे एकमेकांनवर रचून बालेकिल्ल्याची बुरूजयुक्त तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीला पुर्वाभिमुख असलेल्या छोट्या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश होते. बालेकिल्ल्यात तसेच गडावर सर्वत्र झाडी खुप आहे. दरवाजा पासून थोड्याच अंतरावर गडावरील छत्रपती शिवाजी महारजांनी इ. स. १६६१ मधे गडाची डागडुजी करून बांधलेले भवानीमातेचे मंदिरा आहे. तसे पहाता भवानी गडाचा बालेकिल्ला अगदीच आटोपशीर आहे. भवानी मात मंदिर व वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तसेच दोन शिवलिंग व एक भवानी मातेची मुर्ती आहे. गडावरील एकमेव तोफ मंदिरातच आहे. मंदिरा समोरील वाड्याचे अवशेष पाहून मंदिरा मागिल तटबंदीला असणाऱ्या उत्तराभिमुख दरवाज्यतातून खाली उतरावे. थोडे खाली उतरल्यावर लगेचच उजव्या हाताच्या पायवाटेने चालत पाण्याच्या टाक्यांन जवळ जाता येते. कातळात कोरलेली दोन टाकी असून एक टाके भुयारी आहे. भवानीगडावरून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेले बहिरवगड व प्रचितगड दुरवर ओळखता येतात.

किल्ले भवनीगड, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment