Followers

Wednesday, 27 May 2020

दुर्ग प्रकार : एका संक्षिप्त परिचय भाग 2

दुर्ग प्रकार : एका संक्षिप्त परिचय
भाग 2Tikona fort/किल्ले तिकोना/lonavla/One day trek/Marathi ...
लेखनसिमा
श्री शिवसेवेशी तत्पर तुषार भोर निरंतर. अध्यक्ष सखा सह्याद्री गिर्यारोहक पुणे.

* वनदुर्ग किंवा जंगली किल्ला
गिरिदुर्ग प्रमाणे वनदुर्गाचे सुद्धा फायदे आहेत, परंतु वनदुर्ग हा प्रकार थोडा मर्यादित स्वरूपाचा आहे. वनदुर्ग म्हणजे जंगलाच्या मध्यभागी बांधण्यात आलेला किल्ला. अशा प्रकारच्या किल्ला घनदाट जंगलाने वेढलेले असतो तसेच अशा प्रकारच्या जंगलात हिंस्र श्वापदांचा वावर असतो.
अशा भयंकर अरण्याने वेढलेल्या किल्ल्यापर्यंत पोहचण्याचे मार्ग हे अडचणीचे, तीव्र उतार आणि दमछाक करणारे असतात, म्हणजेच अशा प्रकारच्या किल्ल्यावर सहजा सहजी पोहचता येत नाही म्हणून त्यास वनदुर्ग किंवा जंगली किल्ले म्हणतात
*फायदे
1) वनदुर्ग ह्या प्रकारात राजा, जेव्हा राज्यावर संकट येते तेव्हा राजा वनदुर्गचा आश्रय घेतो.
उदा.अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी अंतिम युद्धासाठी जावळी सारख्या निबिड अरण्यात बांधलेला प्रतापगड निवडला व भयंकर अशा क्रूरकर्मा खानाची फौज बुडविली ते प्रतापगडच्या आणि जावळीच्या निबिड जंगलामुळेच.
2) कधीकधी वनदुर्गामध्ये कैद्यांना सुद्धा ठेवता येते. उदा: पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जोहर ला मदत करणा-या हेंरी रेविंग्टनला जेव्हा महाराजांनी पकडले तेव्हा त्यास वासोटा ह्या जंगली किल्यात ठेवले होते.
तर अशा ह्या वनदुर्गाचे तोटे सुद्धा आहेत. जितका सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार चांगला तितकाच वस्तीच्या आणि राज्यकारभार दृष्टीने योग्य नाही म्हणून सदर दुर्गप्रकार दुय्यम समजला गेला.

No comments:

Post a Comment