"गडकिल्ल्यांचे स्थापत्य: भारतवर्षाची प्राचिन परंपरा"
भाग १
पोस्टसांभार : श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
प्रस्तुत लेखात भारतीय स्थापत्यशैली गड-किल्ल्यांच्या अनुषंगाने किती पौराणिक आहे याचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.
भारतीयांच्या मनावर इंग्रजांनी हेच बिंबविले आहे की " तुम्हां भारतीयांना
स्वतःची अशी बांधकाम शैली(CIVIL WORK ) किंवा स्थापत्यशास्त्र (
ARCHITECTURE ) नव्हतेच. जी काही बांधकामे भारतात झाली ती सर्व इंग्रज आणि
मुघलांनी केलीत"
परंतू हे विधान पुर्णपणे चुकीचे आहे हे आपल्या गडकिल्ल्यांचा स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने केलेला अभ्यास विचारात घेतल्यावर पटते.
ह्या आठ हजार वर्षांच्या इतिहासाच्या काळजात दडलाय तो अनमोल ठेवा जो गौरवशाली भारतवर्षाच्या परंपरेचा उद्गाता आहे.
भारतीय परंपरांचा पायिक या नात्याने मनाला या गोष्टीची कायम खंत वाटत
आलेली आहे. आपण भारतीय सुद्धा हे मान्य करतो आणि अशा परकीय सत्तेपुढे
स्वधर्माभिमान विसरून मान तुकवतो.परंतु आपल्याला अक्कल शिकवू पाहणाऱ्या
इंग्रजांच्या तथाकथित ख्रिश्चन धर्माचा उदय साधारण दोन हजार वर्षापूर्वी तर
इस्लाम धर्माचा उदय पंधराशे वर्षांपूर्वी झाला आहे. याउलट भारतीय सनातन
हिंदूधर्म जवळजवळ आठ हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे.
गडकिल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र हे भारतामध्ये किती प्राचिन आहे याची
प्रचिती हिंदूधर्मातील प्राचिन व पौराणिक ग्रंथात केल्या गेलेल्या विविध
उल्लेखांमधून जाणवतं.
*ऋग्वेदामधील पुरावे*
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील 'ऋग्वेद' हा आद्यग्रंथ मानला जातो.
ऋग्वेदामध्ये आपल्याला किल्ल्यासंदर्भात उल्लेख आढळतो. साधारणत: हा उल्लेख
इ. स.पूर्व 6000 च्या सुमारास सापडतो. ऋग्वेदात कडेकोट बंदोबस्त असलेल्या
दुर्गांचे अनेक उल्लेख सापडतात.काही ठिकाणी चिरेबंदी कोट असल्याचा
उल्लेखही मिळतो तर अशा कोट असलेल्या नगरांना पूर असे म्हणतात .उदा.
बुऱ्हाणपूर, सोलापूर, कोल्हापूर इ.
त्यावेळी शंबर व वेदिकांमध्ये
झालेल्या संघर्षाचा प्रामुख्याने पुरावा ऋग्वेदामध्ये सापडतो. शंबराने
पर्वतावर अनेक दुर्ग बांधल्याचा उल्लेख मिळतो. वृगंदाचे शेकडो दुर्ग नष्ट
करण्यात वृजिशान यशस्वी झाला होता. तसेच वामदेव ऋषींना लोहमय किल्ल्यात
ठेवून सुद्धा त्यांनी त्यातून पलायन केले होते. येथील लोह म्हणजे बळकट
अभेद्य किल्ला असा अर्थ होतो.उदा. देवगिरी.
इंद्र देवाने कितीतरी लोहमय
किल्ले नष्ट केल्याचे उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये सापडतात म्हणूनच
इंद्रास पुरंदर असे देखील म्हटले जाते.तसेच वेदांमध्ये चिलखते, लोहमय
आयुधे (शस्त्रे ) यांचा उल्लेख आपल्याला अभ्यासायला मिळतो.
No comments:
Post a Comment