दुर्गांची प्रमुख अंगे
भाग १
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
जेव्हा एखादा किल्ला एखाद्या डोंगरावर बांधायला घेतात तेव्हा सर्वात प्रथम त्या किल्ल्याचे संरक्षण दृष्ट्या महत्त्वाचे बांधकाम करण्यात येते, कारण कुठल्या किल्ल्याची सुरक्षा प्रथम विचारात घेतली जाते. उदा.राजगडाचे बांधकाम करताना सर्वात पहिली तटबंदी बांधली त्यांस सुवेळा माची असे म्हणतात. ती बांधण्याचा मुहूर्तच सकाळचा म्हणजेच सुर्योदयाचा होता म्हणून त्यास महाराजांनी 'सुवेळा' माची हे नाव दिले.
परंतु आपण तटबंदी आगोदर खंदकाबद्दल माहिती घेणार आहोत आणि मग क्रमाक्रमाने तटबंदी, बुरुज आणि महाद्वार अशा पद्धतीने माहिती घेणार आहोत.
🚩खंदक 🚩
स्थलदुर्ग किंवा मिश्रदुर्ग ह्या प्रकारात किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी
खंदक किल्ल्याभोवती करण्यात येतो. अशाप्रकारचा खंदक महाराष्ट्रात गोपाळगड
दाभोळ येथे तर देवगिरी संभाजीनगर येथे दिसून येतो. खंदकात पाणी सोडून
किंवा नैसर्गिक झरे असतील तर ते पाणी साठवून त्यात मगरी, सुसरी सोडल्या
जातात जेणेकरून बाहेर येणारा शत्रू खंदकात प्रवेश करू शकत नाही. खंदकाचे
बांधकाम करताना प्रथम सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा स्त्रोत शोधण्यात येतो जर
नगरा जवळ एखादी नदी असेल तर नदीतून खंदकात पाणी पाटाद्वारे सोडले जाते.
जर नदी नसेल तर नैसर्गिक झऱ्यांचा शोध घेतला जातो. खंदक पूर्ण खोदून
झाल्यावर त्याचा पाया उकळत्या शिस्यात गुळ आणि चुना टाकून भक्कम केला
जातो. नंतर त्यात पाणी सोडून मगरी, सुसरी, विषारी साप आणि काटेरी वेली
सोडल्या जातात जेणेकरून खंदक सहजासहजी ओलांडता येऊ नये तसेच जिथे जिथे
किल्ल्याला द्वार असेल तिथे तात्पुरत्या स्वरूपाचा वर-खाली हालचाल करणारा
पुल तयार केला जातो आणि संकट काळात हाच पूल ओढून घेऊन किल्ल्याचे द्वार बंद
केले जाते त्यामुळे शत्रूस सहजासहजी खंदक पार करता येत नाही. खंदकाची
खोली बऱ्याच ठिकाणी भिन्न स्वरूपाची पाहण्यास मिळते काही ठिकाणी ती दहा
फूट तर काही ठिकाणी ऐंशी फूट सुद्धा पाहण्यास मिळते. देवगिरी किल्ल्यावरील
खंदक तर सत्तर ते ऐंशी फूट खोल आहे. आपल्या भारतीय इतिहासात अयोध्या,
पाटलीपुत्र यासारख्या शहरांना मोठ मोठे खंदक असल्याचे वाचण्यास मिळते.
No comments:
Post a Comment