Followers

Saturday, 16 May 2020

मयूरगड

बागलाण प्रांत अनेकविध अविष्कारांनी समृद्ध आहे. अश्याच मुल्हेर ह्या गडाला शिवकाळात व पौराणात अनन्यसाधारण महत्व आहे. मुल्हेर ही महाभारतातील मयूरध्वज राजाची राजधानी होती. राजाच्या नावावरून ह्या किल्ल्याला

मयूरगड हे नाव पडले होते. तलवारींच्या मुल्हेरी मुठींसाठीही मुल्हेर प्रसिध्द होते, तसेच मुल्हेरची टाकसाळही प्रसिद्ध होती. हा किल्ला दोन डोंगरांमध्ये विभागला आहे. गडाभोवती १२ डोंगरांचे भक्कम कडे आहेत. दुसऱ्या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला.

मुल्हेर माचीवरनं सोमेश्वर मंदिराकडं जाताना वाटेत लागतो तो हा गणेश तलाव, तलावाच्या काठावर गणपती मंदिर आहे. ह्या मंदिरात गणरायाची एक खडकात कोरलेली मूर्ती असून जवळच खाली जमिनीत कोरलेलं शिवलिंग आहे. हे मंदिर अतिशय आखीव रेखीव असून स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मागे दिसतो तो मुल्हेर चा सोबती हरगड.

No comments:

Post a Comment