वैभव महाराष्ट्राचे!
सह्याद्रीतील घनदाट चांदोली अभयारण्यात स्थित असलेला किल्ले प्रचितगड खुप दुर्गम आहे. चांदोली गावाकडून फॉरेस्ट ऑफिसरची परवानगी घेऊन रूंदीव मार्गे प्रचितगड गाठता येतो. पण हे आरण्य वाघाच्या प्रजननासाठी राखीव ठेवल्याने परवानगी मिळणे कठिण आहे. दुसरा मार्ग महाराणी येसूबाई यांचे माहेर शृंगारपूर (कोकणातील संगमेश्वर, रत्नागिरी) गावाकडून आजही गडावर जाता येते.
गडावर तटबंदी, बुरूज, पडका दरवाजा, पाण्याचा हौद, वाड्याचे अवशेष, घरांची जोती पहायला मिळतात. उंचवट्यावर
दक्षिणाभिमुख महादेव मंदिर असून, काही देवतांच्या दगडी मुर्ती आहेत. तसेच
समोर चार पाच तोफा आहेत. पुर्वेस कातळात कोरलेली पाण्याची पाच टाकी असून
त्यातील दोन टाक्यात खांब आहेत. हे पाणी पुण्यास योग्य आहे. गडाच्या
तटबंदीवर एक वानर शिल्प कोरलेले आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment