Followers

Wednesday, 27 May 2020

दुर्ग प्रकार : एका संक्षिप्त परिचय भाग 4

दुर्ग प्रकार : एका संक्षिप्त परिचय

भाग 4

लेखनसिमा

श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

* स्थलदुर्ग किंवा भुईकोट किल्ला *

मैदानी प्रदेशात जिथे डोंगर रांगा नाहीत अशा भागात स्थलदुर्ग अथवा भुईकोट उभारण्यात येतो. स्थलदुर्गाला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तटबंदी आणि खंदक ह्या दोन महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून राहावे लागते.

उत्तर हिंदुस्थानात प्रामुख्याने गंगेच्या मैदानी प्रदेशात जी मोठी मोठी राज्ये उभी राहिली, त्यांनी प्रामुख्याने स्थलदुर्गाची उभारणी केली.

स्थलदुर्गाच्या उभारणीचे शास्त्र महाभारत इत्यादी अनेक ग्रंथात सापडते हे आपण मागील लेखात पाहिलेच. प्रसिद्ध अशा पाटलीपुत्रचे वर्णन जे ग्रीक सेनापती मॅगेस्थिनीयने

केले आहे ते पुढीलप्रमाणे.

गंगेच्या तीरावर पाटलीपुत्र ही भव्य नगरी आहे ह्या नगरीची लांबी साडे चौदा किलोमीटर तर रुंदी अडीच किलोमीटर आहे, शहराच्या भोवती मोठा तट बांधला असून त्यांस चौसष्ठ वेशी आणि पाचशे सत्तर बुरुंज आहेत तसेच त्या तटाभोवती खोल खंदक असून त्यात गंगेचे पाणी फिरविले आहे. त्या खंदकातील पाण्यात भयंकर अशा मगरी, सुसरी आणि विषारी साप सोडले आहेत त्यामुळे आक्रमण करणाऱ्यांना आत प्रवेश मिळू शकत नाही. तसेच अशा ह्या सुंदर नगरीत दोन मजली तीन मजली घरे आहेत. राजाचा राजवाडा हा सात मजली असून तो मोठ मोठया वृक्षांनी वेढलेला आहे."

आणखी उदाहरण द्यायचे झाल्यास चाकण चा संग्राम दुर्ग, परांडा किल्ला, नळदुर्ग किंवा पुण्यातील शनिवारवाडा हा सुद्धा भुईकोट किल्लाच म्हणावा लागेल.

*फायदे :

मैदानी प्रदेशात राजपरिवार आणि राज्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर उत्कृष्ट बांधणीचा भुईकोट उपयोगी ठरतो. शेवटी किल्ल्याची भक्कमता त्या किल्ल्यातील भक्कम आणि धैर्यशील मनाच्या माणसावर ठरते.

परंतु भुईकोटाचे तोटे देखील आहेत अशा प्रकारचा किल्ला जास्त दिवस शत्रूच्या माऱ्याला तग धरून ठेऊ शकत नाही म्हणून त्यांस जास्तीत जास्त सैन्य बळावर रहावे लागते त्यामुळे यांस चतुर्थ स्थान देण्यात आले आहे.

तरी अशा प्रकारे वरील चार मुख्य प्रकार आपण पहिले परंतु मिश्रदुर्ग ह्या प्रकारात सुद्धा काही किल्ले येतात उदाहरणार्थ संभाजीनगर चा देवगिरी किल्ला, रत्नदुर्ग, विजयदुर्ग इत्यादी.

No comments:

Post a Comment