वैभव महाराष्ट्राचे!
केळझर किल्ला लहान टेकडीवर वसलेला गिरीदुर्ग आहे. केळझर हे गाव नागपूर वर्धा मार्गावर टेकडीच्या कुशीत वसले आहे. वर्धा - पवनार - सेलू - केळझर अशा मार्गे पोहचता येते. केळझर गाव सम्राट अशोकाच्या काळापासून प्रसिद्ध आहे. तुरळक तटबंदी, पाण्याची बांधीव विहीर आणी नव्यानेच बांधलेले गणपती मंदिर, हनुमंत मंदिर आणी शिवमंदिर पहायला मिळतात. सिद्धीविनायक जागृत गणपतीचे येथे मंदिर आहे. वशिष्ट पुराण, महाभारत व भोसलेकालीन इतिहासात या विनायकाचा उल्लेख आहे. गडावर एकूण तीन गणेश मुर्ती आहेत. त्यातील पहिली मुर्ती पाण्याच्या बांधीव विहीरीच्या दरवाजावर आहे. दुसरी मुर्ती सिद्धीविनायक मंदिरा मागे आहे. ही मुर्ती बरीच मोठी आहे. तीसरी मुर्ती मुख्य मंदिरात आहे. मुर्तीची उंची जवळपास ३ फुटाची आहे. गणेशाचे मुख विशाल असून डोळे सुबक आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याच्या चौकटीवर लाकडी कमानीत अष्टविनायकांची प्रतीम कोरलेली आहेत.
वशिष्ठ पुराणाप्रमाणे या गावाचे तत्कालीन नाव एकचक्रनगरी होते. श्रीरामचंद्र प्रभुचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे वास्तव्य येथे होते. वशिष्ठ ऋषींनी भक्ती व नियमित पुजेकरिता स्वत:च या गणपतीची स्थापना केली. याच काळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचाही उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरदविनायक होते, तसेच वर्धा नदीचे वरदा! हा काळ रामजन्माच्या पूर्वीचा आहे. कालांतराने सिद्धीविनायक असे नाव प्रसिद्ध झाले. महाभारतात पांडव या गावात वास्तव्याला असताना बकासूर नामक राक्षसाचा वध झाल्याची नोंद आहे. गणपती मंदिर म्हणजे निसर्गरम्य टेकडी वाकाटक नंतरच्या काळापासून एक भव्य किल्ल्याचे ५ बुरूज व ३ माती गोट्यांनी बांधलेले परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी विहिर असून ती गणेश कुंड म्हणून ओळखली जाते. वाकाटकनंतर हे गाव प्रवरसेन राजाचे मुख्यालय राहिले. भोसले राजे कोल्हापुराहून नागपूर येथे स्थलांतरीत होण्यापूर्वी केळझर येथे मुक्कामाला होते. अशी इतिहासात नोंद आहे. केळझरस्थित वरदविनायक श्री गणपतीची अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक, जागृत मूर्ती आहे. गड परिसरात साईबाबा, पंढरीचे विठ्ठल-रुख्माई, लक्ष्मीमाता मंदिर, श्री. गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर व टेकडीवरील शिव मंदिर असल्याने सिद्धीविनायकाच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना या सर्व देवतांचे दर्शन घडते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात प्राचीन भारताचे पुरावे मिळतात काय म्हणून दोन महिने उत्खननाचे कार्य केले. विभागप्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात काम करीत असताना त्या ठिकाणी मंदिराच्या पुर्वेकडील भागात उत्खनन करीत असताना तेथे प्राचिन किल्ल्याच्या दगडी भिंती, बुरूज, पाणी काढण्याकरिता बनविण्यात आलेली चिरेदार नाली आढळली. सोबतच मडके, काचेची खेळणी, बांगड्या तसेच अश्वाचा सांगाडा अशी अनेक साहित्य मिळून आले. दुसऱ्या टप्प्यातील उत्खननात प्राचीन चिरेदार पाषाणाची विहीर (बावडी) आढळून आली. तसेच देवतांचे भग्नावशेष, जैन तिर्थकरांच्या मूर्तीचे अवशेष, भगवान शंकराचे वाघ, डमरु, शिवलींगाचे भग्नावशेष मिळाले आहे. या उत्खननात मिळालेले संपूर्ण अवशेष हे प्राचीन वाकाटकाच्या काळानंतरचे व यादव कालीन (हेमाडपंथीय) इसवी सन १३ किंवा १४ व्या शतकातील असल्याचा अंदाज या विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक वेळी उत्खननात मिळणाऱ्या प्राचीन ऐतिहासीक वास्तू व वस्तुंमुळे या एकचक्रनगरीला प्राचीन ऐतिहासिक वारसा असल्याचे सिध्द होत आहे.
किल्ले केळझर, ता. सेलू, जि. वर्धा
# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:
Post a Comment