Followers

Sunday, 24 May 2020

“पाली सुधागड” म्हणजे भोर संस्थानाचे वैभव....🚩

गडकोट म्हणजे, राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ,
“पाली सुधागड” म्हणजे भोर संस्थानाचे वैभव....🚩
.
भोरच्या सचिवांच्या पदरचा एक पराक्रमी मराठा सरदार राजाराम महाराज जिंजीस असताना महाराष्ट्रातील किल्ले आणि प्रदेश पुन्हा काबिज करण्याचा मोठाच उद्योग मराठे विरांना हाती घ्यावा लागला सचिवांच्या आज्ञेने सरदार नावाजी बलकवडे सिंहगड जिंकला पूर्वी सुभेदार तानाजी मालुसरेंनी जसा धाडसी हल्ला केला होता अगदी त्याच पद्धतीने सिंहगड जिंकला स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर ते कोकणातील पाली सुधागड परिसराचा सुभेदार झाले...
.
“गडावरील पाच्छापूर दरवाजा...”
किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसते त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना आहे या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्यकोठारं, भाड्यांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ आहे उजवी कडे गडाची नैसर्गिक तटबंदी दिसते.. या गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी शत्रू एक दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश...
.
इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले होते पण आता त्या वास्तूची दुरवस्था झाली असल्यामुळे दिसत नाही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश होता...
.
-------------------
फोटोग्राफर : गौरेश भोसले...( @gauresh_bhosle_2709 )

No comments:

Post a Comment