भाग १
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
आज आपण शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्राबद्दल जाणून घेणार आहोत.
"हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत" असे उद्गार महाराजांनी काढल्याचा उल्लेख इतिहासातून मिळतो. वरील वाक्य किती समर्पक होते याचा प्रत्यय नंतर काही वर्षांत आला सुद्धा!
महाराजांना माहित होते दिल्लीपती आलमगीरसोबत मराठ्यांना एक ना एक दिवस
अंतिम युद्ध निकराने लढावेच लागेल आणि त्यावेळेस एक एक किल्ला जर एक एक वर्ष लढवला तर तर तीनशे साठ किल्ले मिळविण्यास औरंगजेबास 360 वर्षे लागतील. म्हणजे सर्वार्थाने दख्खन मधील राज्य जिंकायचं तर गडकोट जिंकण्याशिवाय त्यांस पर्याय नाही.
शिवरायांच्या पश्चात औरंगजेब जेव्हा स्वराज्य गिळंकृत करण्यास आला तेव्हा त्याच्या एका धडकेत आदिलशाही आणि कुतुबशाही जमीनदोस्त झाली पण काही वर्षांपूर्वी उभे राहिलेले आणि गरीब मावळ्यांच्या रक्तावर पोसलेले स्वराज्य काही त्यांस मिटवता आले नाही.
स्वराज्य बाटवायला आलेल्या धर्मांध औरंगजेबास शेवटी याच मातीत चिररनिद्रा घ्यावी लागली.यातूनच गड कोटांचे महत्व अधोरेखित होते. महाराजांच्या इतका दुर्गप्रेमी नाहीच! म्हणतात ना महाराज जन्मले गडावर, महाराज रांगले किल्ल्यावर, महाराजांनी स्वराज्य निर्माण केले गडांच्या मदतीने, महाराजांनी राजकारण केले ते सुद्धा गडावरून आणि शेवटी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला तोही गडावरच.
म्हणूनच महाराजांच्या व्यक्तिमत्वापासून गडकोट वेगळे होऊच शकत नाही.
महाराजांनी आपल्या हयातीत 20 ते 25 किल्लेच बांधले पण प्रत्येक किल्ला महाराजांच्या अभिनव शास्त्राचा प्रयोगच म्हणावा लागेल म्हणून तर लेखाला नाव सुद्धा "महाराजांचे दुर्गशास्त्रातील अभिनव प्रयोग" असे दिले आहे.
यांत अगदी स्वराज्याच्या सुरुवातीला बांधलेला आणि प्रथम राजधानीचा मान असलेला राजगड असो अथवा द्वितीय राजधानी असलेला रायगड असो. दोन्हीही एकमेकांपेक्षा वेगळे आणि सरस.
राजगड पहिला तर भुजंगाच्या चाली सारखा नागमोडी तर रायगड शेषाच्या फण्यासारखा दिमाखदार. म्हणूनच महाराजांनी बांधलेला प्रत्येक किल्ला एका दुर्गवेड्या चित्रकाराच्या कुंचल्याच्या किमयेचे प्रतिकच वाटतो.
खरं म्हणजे प्रत्येक दुर्गभ्रमराला सह्याद्रीमध्ये भटकताना काही प्रश्न जरूर पडतात.
जसे -
# महाराजांनी बांधलेल्या द्वाराला गोमुखी द्वार असे का म्हणतात?
# महाराजांनी बांधलेल्या बहुतेक किल्ल्याचे द्वार उजवीकडे व तटबंदी डावीकडे का?
# काही तटबंदीवर दुहेरी नाळ कशासाठी बांधलेली आहे?
# तटबंदी जवळ एखादे शस्त्र कोठार काढायचे सोडून पाण्याच्या टाक्या का?
# काही तटबंदींना चुना, शिसे न वापरता फक्त दगडावर दगड रचलेत ते का बरे?
असे किती तरी प्रश्न पडतात आणि ह्या प्रश्नांची उत्तरे जो तो आपल्या परीने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा दृष्टिकोनातून शोधायचा प्रयत्न देखील करतो.
परंतु याचे उत्तरमला सापडले दुर्गमहर्षी प्रा. श्री. घाणेकरांच्या एका व्याख्यानात आणि त्यांच्या " महाराजांचे दुर्गविज्ञान " या लिखित पुस्तकातून मग त्या अनुषंगाने जेव्हा त्याचा शोध घेतला तेव्हा
महाराजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन समोर आला तोच तुम्हां वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही येथे करत आहोत.
No comments:
Post a Comment