एक दहशत यासाठी कि, हा किल्ला ४२६७ फूट उंचीचा असा वनदुर्ग प्रकारातील असून, नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला ‘जावळीच्या जंगला’मधील एक अनोखे “दुर्गरत्न” आहे. साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. येथे साहसाबरोबरच कस आणि मनोधैर्य, इ.ची परीक्षा होते.
जितकी दहशत टकमक टोकाची आहे तितकीच किंवा त्याही पेक्षा भयंकर दहशत आहे. शिवकाळातील दिल्या जाणाऱ्या कैद शिक्षेची इथे दहशत आहे ती कोयनाखोऱ्यात पसरलेल्या दुर्गम आणि निर्भीड जंगलाची आणि सह्याद्रीच्या कड्याकपारीची.
डोक्यावर सूर्य असतानाही सुर्यप्रकाश जमिनीवर पडत नसेल असे घनदाट जंगल, झाडाझुडपांनी वेढलेले अतिशय निर्जन ठिकाण तसेच वाघ, बिबट्या यासह जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासोटा किल्ल्याचा वापर हा ‘तुरुंग’ म्हणून केला जात होता. इंग्रज अधिकार्यांना अटक करून तर काहींना कैदी म्हणून येथे ठेवल्याची नोंद आहे. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले होते. येथील दुर्गम परिसराची पेशवाईतही नोंद आहे.
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत.
वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता व साहसाची अनुभूती देणारा किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते.
या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. कोयना नदीवर धरण बांधलेले आहे. या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय म्हणतात. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरले असून ते वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे.
पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. वसिष्ठचे पुढे वासोटा झालं असावेे, असे बोलले जात आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला.
या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी दि. ६ जून १६६० रोजी वासोटा किल्ला घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. मात्र, त्यांनी तो सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्याला अटक केली व दुर्गम अशा वासोट्या किल्ल्यावर त्याला ठेवले. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेचे वासोटा किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असल्याचे स्पष्ट होते.
वासोटा किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात पायर्या लागतात. या पायर्यांपासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळ एक हत्तीचे शिल्पही पडलेले दिसते.
हा दरवाजा पाहून परत पायर्यांनी वर चढल्यावर आपण वासोटा किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करतो. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे होते. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्य़ा दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे.
मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते.येथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पूढे ही वाट कड्यापाशी जाते येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. परत मारुती मंदिरापाशी येउन उजव्या बाजूस जाणारी वाट पकडावी ही वाट ’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते.
या वाटेवर पहिल्यांदा डाव्या हाताला एक मोठा तलाव दिसतो.या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्याबाजूची वास्तू पाहायला मिळते. येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे.
काळकाईचे ठाणे पाहून पुन्हा मारुतीच्या देवळापाशी आल्यावर डावीकडे जाणार्या वाटेवर एक चुन्याचा घाणा पडलेला आहे. पुढे गेल्यावर जोड टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि आपण बाबु कड्यापाशी येऊन पोहोचतो. या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’ अक्षरा सारखा आहे.
याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. या कड्यावरून समोरच दिसणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय. नव्या वासोट्याच्या बाबु कड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व जंगली हिंस्र जनावरं असल्याने सहसा येथे कोणी जात नाही.
No comments:
Post a Comment