Followers

Monday, 18 May 2020

किल्ले व्याघ्रगड (वासोटा)

वैभव महाराष्ट्राचे!

कोयना धरणामुळे तयार झालेल्या शिवाजी सागर या अफाट जलाशयाने तसेच सह्याद्रीतील जावळीच्या घनदाट जंगलामुळे अतीदुर्गम झालेला व्याघ्रगड गिर्यारोहकांचे आकर्षण बनला आहे. बामणोली येथील वनखात्याच्या कार्यालयातून लिखीत स्वरूपात परवानगी घेऊन लाँचने शिवाजी सागर पार करून मेट इंदवली येथे उतरावे. या ठिकाणी ही वनविभागाचे कार्यालय आहे, तेथे पुन्हा तपासणी होते. नंतरच गडावर सोडले जाते.

जंगलातील मळलेल्या वाटेने ओढे नाले पार करत वाटेवर विराजमान असलेल्या हनुमंताचे आणी श्री गणेशाचे दर्शन करून गड माथा गाठता येतो. वासोटा गडाची बांधणी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केल्याचा उल्लेख आढळतो. कातळकोरीव पायऱ्या चढून गेल्यावर तटबंदी बुरूज युक्त पडक्या दरवाजातून गडप्रवेश होतो. गडमाथ्यावर हनुमंत मंदिर, महादेव मंदिर, पाणी टाकी, तलाव, राजवाड्याचे अवशेष, घरांची जोती, चुन्याचा घाणा पहायला मिळते. गडावरून जुना वासोटा आणी त्याचा प्रसिद्ध बाबुकडा पहायला मिळतो. तसेच नागेश्वर गुहा आणी त्या मागिल महीमंडणगड ही स्पष्ट दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालूक्यात असलेल्या चोरवणे गावातून कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गे नागेश्वरला जाता येते.

किल्ले व्याघ्रगड (वासोटा), ता. जावळी, जि. सातारा

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment