Followers

Monday, 18 May 2020

किल्ले लहूगड

वैभव महाराष्ट्राचे!

अजिंठा सातमाळच्या उपरांगेतून फुटलेल्या वेरूळच्या डोंगररांगेवर किल्ले लहूगड आहे. संभाजीनगर - फुलंब्री - जातेगाव - नांद्रे या मार्गे लहूगडास जाता येते. कातळकोरीव पायऱ्या आणी दरवाजा मार्गे गडप्रवेश होतो. गडावर तटबंदी, बुरूज, खुप सारी पाणी टाकी, अनेक प्रशस्त गुहा, लेणी आहेत. तसेच शेजारील डोंगरावरही अनेक गुहा कोरलेल्या आहेत.

गडावर सुप्रसिद्ध रामलिंग लेणे आहे. हे रामेश्वर महादेवाचे हेमाडपंती मंदिर असून ते डोंगराच्या मधोमध कोरलेले आहे. लेण्या समोर श्री गणेशाचे सुंदर मंदिर आहे. शेजारीच असलेले दगडी खांबावर श्रीकृष्णाची मनमोहन मुर्ती कोरलेली आहे. लेण्यात विराजमान असलेले शिवलिंग आणी नंदी हे जागृत देवस्थान आहे. एका आख्यायिकेप्रमाणे येथे सीतेचे वास्तव्य होते. रामायणातील लव-कुश यांचे जन्मस्थळ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

किल्ले लहूगड, ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर (औरंगाबाद)

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment