देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री...आणि ह्या सह्याद्रीतला निसर्ग सौंदर्यातला “माळशेज घाट”...🚩
.
जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा पश्चिमेकडून डोंगराळ तर पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भुभाग आहे त्यामुळे इथल्या डोंगररांगेत माळशेज घाट, नाणेघाट व दऱ्याघाट या प्रमुख घाटवाटा आहेत...
.
प्राचीन हमरस्त्यांचा राजा सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली.. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठाण व तेर ही.. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात आल्या गेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होत त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले ते कोकण व घाटमाथा यांना जोडत कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता....
No comments:
Post a Comment