वैभव महाराष्ट्राचे!
किल्ले महीमतगड समुद्रसपाटीपासून ८०८ मी. उंचीचा वनदुर्ग आहे. डोंगर पठारावर वसलेल्या निगुडवाडीतून गडावर वाट जाते. निगुडवाडीस जाण्यासाठी संगमेश्वर - देवरूख - निवे - बेलारी मार्गे डांबरी रोड आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या महिमतगडाचा मुख्य दरवाजा उत्तर टोकाला आहे. बुरुज, तटबंदी, दरवाजे चांगल्या अवस्थेत असून गडावर भरपुर अवशेष इतीहासाची साक्ष देतात. दाट जंगल असल्यामुळे गडावर वन्य प्राण्यांचा वावर असतो.
दरवाजातून गड प्रवेश केल्यावर समोरच भलेमोठे पाणी
टाके दिसते, पुढे शौचकूप ही दिसते. तसेच दुसऱ्या दरवाजा तटबंदीतून आत
गेल्यावर तलाव, भवानी मंदिर, महादेव मंदिर, हनुमंत मंदिर, महिषासुर मर्दानी
मंदिर पहायला मिळते. मंदिरा समोर काही तोफा ही पहायला मिळतात. उंच
माथ्यावर ध्वजस्तंभ आसून त्यावर भगवा ध्वज फडकत आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment