वैभव महाराष्ट्राचे!
किल्ले रामटेक उर्फ रामगिरी हे प्राचिन काळापासूनचे धर्मस्थान आहे. प्रभू रामचंद्र गडावर थांबले असल्याचा धार्मिक विश्वास आहे. महाकवी कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य याच ठिकाणी रचले. यादव राजांनी श्रीराम लक्ष्मणाची उत्तुंग मंदिरे बांधली. श्री चक्रधर स्वामींनी याच ठिकाणावरून धर्म उपदेश केला. नागपूरकर राजे भोसले यांनी मंदिरांचा निर्माण तसेच जिर्णोद्धार केला. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी याच गडावर ध्यान साधना केली.
वाकाटक राजवंशातील रूद्रसेन
द्वितीय याची पट्टराणी प्रभावती ही वैष्णव भक्त होती, तिने आणी तिच्या
पुत्र पौत्रांनी या रामगिरीवर नरसिंह, त्रिविक्रम, वराह, गुप्तराम इ.
मंदिरे उभारली. नरसिंह मंदिरात कोरलेला ब्राम्ही लिपीतील शिलालेख याची
साक्ष देतो. गडपायथ्याशी असलेला अंबाळा तलाव पवित्र सरोवर आहे. त्याच्या
तिरावर सुंदर मंदिरे आहेत. गडाची तटबंदी, दरवाजे बुरूज, पायऱ्या सुस्थितीत
असून प्रेक्षणीय आहे. गडावर पाण्याची टाकी, हौद, पुष्करणी, लोणी आणी हिंदू
मंदिरांची रेलचेल आहे. पुरातन दरवाजे आणी तोफा ही शाबूत आहेत. मंदिराचे
नक्षीकाम अप्रतिम असून त्यावर मुर्तीरूपात रामयणातील प्रसंग कोरलेले
दिसतात. गडाच्या डोंगरावरच महाकवी कालिदासाचे सुंदर स्मारक उभारले असून याच
ठिकाणी बांधलेले कारंजे प्रेक्षणीय आहे. नागपूर - मनसर - रामटेक मार्गे गड
दर्शनास जाता येते.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment