"सह्याद्री"
तुमचा आमचा "सह्याद्री" म्हणजेच
समुद्रकिनार्याशेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे. ही रांग तापी
नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते
आणि अंदाजे १६०० किमी लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक
, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ
पोहचते . या पर्वतरांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या
पर्वतरांगेची सरासरी उंची १२०० मी आहे अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग
सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या
उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसुबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी
)महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड (उंची १४२४ मी), कर्नाटकात
१८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुडी
शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुडी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वांत उंच
शिखर आहे. पर्वतरांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे हा
तमिळनाडू आणि केरळ यांना जोडतो.. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे
(३०० मी).
तर हा झाला आपल्या सह्याद्रीचा भूगोल, जैवविविधता सुद्धा खूपच सुंदर आहे.
बऱ्याच लोकांना याचा सुद्धा अंदाज नाहीये की आपल्या भारतामध्ये
जो काही पाऊस पडतो त्यास मान्सून असे म्हटले जाते, आणि हा मान्सून
पडण्यामागे सह्याद्रीचा खूप मोठा वाटा आहे. तर असो......
तर अशा या सह्याद्रीच्या अनुषंगानेच मानवी वस्तीचा विस्तार झाला म्हणजेच मनुष्य संस्कृती निर्माण झाली, याच सह्याद्रीच्या कडे कडेने मोठ मोठी राज्ये उभी राहिली आणि ती राज्ये वाचवण्यासाठी मोठे किल्ले बांधले गेले तेही सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तर अशा प्रकारे किल्ल्यांची निर्मिती झाली.....
No comments:
Post a Comment