वैभव महाराष्ट्राचे!
आड किल्ला कळसूबाई रांगेत सर्वात पुर्वेकडे असलेला गिरीदुर्ग असून त्यास सिन्नर - ठाणगाव - आडवाडी असे पोहचता येते. एकूण तीन आडवाडी आहेत, त्यातील मधल्या आडवाडीतून गडावर जाता येते. गावाच्या पश्चिमेस बंधारा असून, बंधार्यावरून गडावर जाणारी वाट आहे. गडाच्या पायथ्याशी हनुमंताचे मंदिर आहे, येथूनच गडावर जाणारी चांगली मळलेली वाट आहे. गडाच्या कातळात उत्तरेस पायऱ्या कोरलेल्या आहेत, या एकमेव वाटेने गडमाथा गाठता येतो. पायऱ्यांच्या सुरूवातीस उजवीकडे कातळकपार आहे. या कपारीत देवीचे मंदिर असून शेजारी पाण्याचे टाके आहे. माथ्यावर एक भग्न मंदिर असून एका पाण्याच्या टाक्यांजवळ उघड्यावर शंकराची पिंड आहे. सात आठ घरांच्या जोत्याचे अवशेष आहेत.
गड माथ्यावर मोठे पठार असून तटबंदीचे तुरळक अवशेष आहेत. तसेच
वेगवेगळ्या ठिकाणी बरीचशी पाण्याची टाकी आहेत. वाड्याचे भग्नावशेष आहेत.
गडाच्या दक्षिणेस औंढा, पट्टा, बितंगा, कळसूबाई शिखर, आलंग, मदन, कुलंग
तसेच उत्तरेस डुबेरा किल्ले दिसतात. गडाच्या एकदम जवळ पवनचक्क्या आहेत.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment