सह्याद्रीची ऐतिहासिक ओळख
सर्व प्रथम मला रामायणाचा संदर्भ देणं
इथं योग्य वाटतं. तुमच्या-आमच्या ह्या प्रिय सह्याद्रीला नाव सुद्धा
नव्हते जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईला घेऊन ह्या अरण्यात दाखल झाले.
काय वाटले असेल मातेला त्यावेळी श्रीरामांसोबत ह्या दंडकारण्यात
प्रवेशताना? आज हा काळाकभिन्न दिसणारा सह्याद्री त्यावेळेस कित्येक
सहस्त्र पटींनी आक्राळ विक्राळ भासला असेल.पण श्रीरामांच्या पदस्पर्शाने
हा सह्याद्री सुद्धा पावन झाला आणि ह्या सह्याद्रीमध्ये वाहणारी गोदावरी
सुध्दा धन्य झाली असेल .तीच्या शितल व
सुमधूर जलाने ह्या थोर आत्म्यांची तहान भागली, येथूनच ह्या आडदांड
दिसणाऱ्या सह्याद्रीला जणू सितामातेने आपल्या हाताने सजवले असेल!
असा
हा सह्याद्री मला कधी प्रभू रामचंद्रांसारखा मर्यादापुरुषोत्तम वाटतो तर
कधी सितामातेसारखा कोमल वाटतो! कधी ह्या सह्य पर्वताच्या खाली उभे राहिले
की तो मला भीमा सारखा बलिष्ठ वाटतो तर कधी छत्रपती शिवरायांच्या नजरेतील
कधीच न शोधता आलेलं गूढ !
तर अशा ह्या सह्याद्रीत घनदाट तरूंनी केलेली
दाटी , उंचच उंच गिरीशिखरे, त्याहूनही उंच सुळके, कुठे तुटलेले कडे तर
कुठे ठाव लागणार नाही अशा अजस्र दऱ्या, अवघड वाटा, लांबच लांब पठारे तर
मोठमोठ्या घळया आणि भयानक कपाऱ्या!
यांच्या माथ्यावरून खाली उतरायची
परवानगी फक्त हवेला आणि ह्या वाटांवरून फिरण्याची ताकद फक्त ह्या
सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या मावळ्याला
No comments:
Post a Comment