वैभव महाराष्ट्राचे!
गाळणा टेकड्यांची एक सलग डोंगररांग पुर्व पश्चिम गेली आहे, त्या रांगेच्या पश्चिम टोकावर किल्ले कंक्राळा उभारलेला आहे. नाशिक - मालेगाव - करंजगव्हाण मार्गे कंक्राळा गाव गाठायचे. गडाच्या दोन टेकड्यामधून खाली उतरणार्या घळीच्या रोखाने आपणच वाट बनवत चालायचे. या घळीतून चढून वर गेल्यावर गडाची तटबंदी आणी दरवाजातून गडप्रवेश होतो.
उजवीकडील कातळात चार पाच गुहा टाकी असून, त्यात
पाणी आहे. गडमाथ्यावर घरांची जोती, पाण्याची टाकी, तटबंदी व बुरूज याचे अवशेष
पहायला मिळतात. गड माथा छोटा आहे. गडावरून गाळणा किल्ला अप्रतिम दिसतो.
पायथ्याशी एका झाडाखाली देवतांच्या मुर्ती उघड्यावरच विराजमान आहेत.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment