"गडकिल्ल्यांचे स्थापत्य: भारतवर्षाची प्राचिन परंपरा"
भाग 4
पोस्टसांभार : श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
* *बुधभुषणंम ग्रंथातील पुरावे*
छत्रपती संभाजी महाराजकृत बुधभुषणंम ह्या ग्रंथात सुद्धा किल्ल्यांसंदर्भात अनेक उल्लेख सापडतात . प्रस्तूत ग्रंथात संभाजी महाराज राजनीती संदर्भात म्हणतात की, किल्ल्याच्या आधाराने एक योद्धा 100 शत्रूंची लढू शकतो शंभर योद्धे दहा हजार शत्रूंशी लढु शकतात म्हणून राजाने नेहमी दुर्गांचा आधार घ्यावा. धन्वदुर्ग, महिदुर्ग, नरदुर्ग, वार्क्ष, अंबुदुर्ग आणि गिरिदुर्ग असे सहा प्रकार सांगितले आहे त्यात गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ला सर्वात श्रेष्ठ समजावा.
तर मित्रांनो वरील वेगवेगळ्या ग्रंथातील पुरावे आपल्याला हेच सांगत आहेत कि दुर्ग बांधणी असो किंवा स्थापत्यशास्त्र असो हे आपण अर्जित केलेले ज्ञान आहे.
त्याचप्रमाणे 'आकाशभैरवकल्प', 'शुक्रनीति' , 'शिल्पशास्त्र', अग्नीपुराण', विष्णुपुराण आदी ग्रंथांमध्ये सुद्धा वरील पुरावे उल्लेखनिय रित्या पाहण्यास मिळतात.
1919 साली रेल्वे मार्गाचे जाळे पसरवताना केलेल्या बांधकामात पाकिस्थानस्थित भूभागात प्रसिद्ध अशा दोन पुरातन शहरांचे (हडप्पा आणि मोहंजोदडो) अवशेष सापडले जे कि सिंधू नदीच्या खोऱ्यातील आहेत. त्या तात्कालीन प्रगत शहरांचा पुरातन काळ ठरवण्यासाठी 'सी -14' नावाची कार्बन टेस्ट केली असता त्या संस्कृतीचा कालखंड जवळ जवळ इसवी सन पूर्व 3100 च्या पूर्वीचा आहे असे समजले. हा संदर्भ इथे देण्यामागचा उद्देश इतकाच की यातूनच लक्षात येईल की भारतीय स्थापत्यशैली ही पुरातन आहे. अगदी ख्रिस्तपूर्व आणि आत्ता आत्ता आलेल्या इस्लामिक स्थापत्यशास्त्राच्या ही पूर्वीपासून आहे.
मित्रांनो जेव्हा जेव्हा भारतावर आक्रमण झाले ते फक्त संपत्तीवर नाही तर संस्कृतीवर, भाषेवर आणि साहित्यावर देखील झाले.शत्रूंनी कितीतरी पुरावे जाळून भस्मसात केले त्यामुळे इतिहासाचा हा अनमोल ठेवा काळाच्या पडद्या आड दडला गेला. तसेच इंग्रजांसारखे शासनकर्ते तर ते किती श्रेष्ठ आहेत हे पटवण्यासाठी भारतीय कालगणना अगदी मोडून तोडून त्यांच्या ख्रिस्ती धर्माच्या नंतरची आहे याचा जोरदार प्रचार केला. त्यामुळे असे अगणित पुरावे भारतमातेच्या उदरात कायमसाठी दडले गेले. तरीही इतिहासाचा आदर राखून त्याचा मागोवा घेणे हेच तुमच्या- आमच्या सारख्या इतिहासप्रेमीचे कर्तव्य!
No comments:
Post a Comment