दुर्गांची प्रमुख अंगे
भाग 2
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
🚩तटबंदी🚩
तटबंदी म्हणजेच किल्ल्याला दिलेले भिंतीचे ठराविक उंचीचे आवरण यात एक
मोजमाप असते जर किल्ला स्थलदुर्ग असेल तर याची उंची 20 ते 40 फूट तर रुंदी
10 ते 20 फुट असते आणि जर किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असेल तर तटबंदीची
उंची 10 ते 20 फुट तर आवश्यक ठिकाणी ती 40फुट सुद्धा असतें आणि रुंदी 8 ते
15फुट असतें. तटाचा पाया हा उकळत्या शिस्यात गूळ आणि चुना वापरून
घातलेला असतो .यांत प्रथम वाळूचा थर नंतर दगड, माती यांचा थर दिला जातो.
असे हे थर हत्तीच्या किंवा बैलाच्या पायाने तुडवले जातात आणि मग तटबंदी
भरून घेतली जाते. काही तट तर इतके विशाल असतात कि त्यावरून राजा रथात बसून
सुद्धा फेरफटका मारू शकतो. उदाहरणार्थ : राजस्थानमधील कुंभलगडाची तटबंदी
सुमारे 36किमी लांबीची आहे आणि जगाच्या पाठीवर एव्हडी मोठी तटबंदी कुठल्याच
किल्ल्याची नाही.
तटबंदीवरुन आतील बाजूला उतरण्यासाठी जिना असतो
तसेच तटाच्या आतील बाजूस काही खोल्या सुद्धा काढलेल्या असतात. तटबंदीच्या
आत पिण्याच्या पाण्याची सोय किंवा टाक्या सुद्धा निर्माण केलेल्या
पाहण्यास मिळतात. काही तटामध्ये गुप्त मार्ग सुद्धा असतात. संकट काळी
त्याच मार्गाने पळून जाण्यासाठी उपाययोजना असते. परंतु या मार्गाबरोबर
अनेक फसवे मार्ग सुद्धा असतात कारण बाहेरचा शत्रू चुकून आत आल्यास तो सहजा
सहजी आत प्रवेश करू नये म्हणून विशेष उपाय केलेले असतात.
ठीकठिकाणी
विषारी सापाची हाडे, कुत्र्याच्या जबड्यातील अणुकुचीदार अग्रांना जहाल असे
विष लावण्यात येते तसेच पायऱ्यांमधील चढ उतार असामायिक असतात. काही
ठिकाणी एकाच मार्गात अनेक फसवे मार्ग जोडलेले असतात जेणेकरून चुकीच्या
दिशेने गेल्यास पाय घसरून तो सरळ खंदकात जाऊन पडतो. अशा वेळी खंदकातील
हिंस्र प्राण्यांना आयती शिकार मिळून जाते.
तर अशा प्रकारे तटबंदीचे बांधकाम केले जाते.
काही ठिकाणी डोंगरी किल्ला असेल तर तटबंदी बांधण्यापूर्वी त्याखालचा कडा सुरुंग लावून तासला
जातो जेणेकरून किल्ला अधिक अवघड होईल.
No comments:
Post a Comment