Followers

Monday, 18 May 2020

किल्ले बितनगड

वैभव महाराष्ट्राचे!

बितंगा उर्फ बितनगड हा कळसूबाई रांगेत असलेला एक सुंदर किल्ला आहे. महांकाळ डोंगराचा स्पर्श लाभलेल्या बितंगा जवळ शेणितचा सुप्रसिद्ध सुळका आहे. गडाच्या पश्चिमेस घोटीचा घाट, कळसूबाई शिखर, अलंग - मदन - कुलंग हे किल्ले आहेत. तर पुर्वेला पट्टा उर्फ विश्रामगड, औंढा, आड हे किल्ले आहेत.

अकोले - राजूर - एकदरा - बितनवाडी अशा मार्गे गड दर्शनास जाता येते. कोकणातून गड उंची जास्त आहे. बितनवाडी कडून आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. नैसर्गिक कातळकड्यांनी संरक्षित गडावर कातळकोरीव पायऱ्या, गुहा, पाणी टाकी, घरांची जोती तर पदरात एक विहीर पहायला मिळते. गडाच्या कातळकड्यावर नजरबाजांसाठी छोट्या गुहा ही आहेत.

किल्ले बितनगड, ता. अकोले, जि. अहमदनगर

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment