शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग
भाग 4
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
आपण महाराजांच्या सागरी किल्ले म्हणजे जलदुर्गांच्या बाबतीत केलेल्या अभिनव प्रयोगांबद्दल माहिती घेणार आहोत.
8 फेब्रुवारी 1665 ह्या दिवसाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे
कारण याच दिवशी इतिहासाच्या कालपटलावर दोन गोष्टी घडल्या - एक मुंबईसारखे
व्यापारी बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण म्हणून दिले आणि त्याच दिवशी
दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपति शिवरायांनी आपल्या सागरी
मोहिमेसाठी स्वतःच्या आरमारासोबत समुद्रावर पहिले पाऊल ठेवले. हीच ती
प्रसिद्ध अशी बसरूर ची पहिली सागरी मोहीम.
इतिहासामध्ये काही घटना अशा
असतात की, त्यांना आपण फक्त 'co-incidence' म्हणू शकतो, त्यात खऱ्या
अर्थाने इतिहासानेच इतिहासाला दिलेला भविष्यातील इतिहासाचा एक गर्भित
इशाराच असतो. महाराजांची पहिली समुद्र सफर आणि पहिली सागरी मोहीम एकाच
दिवशी असण्यामागे निश्चितच भविष्यातील मराठ्यांच्या बलदंड आरमाराची
मुहूर्तमेढ होती. बऱ्याच वेळा शिवचरित्र वाचतांना मन अचंबित होते. फक्त
पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत एखादा माणूस पाठीशी कसलं बळ नसताना स्वराज्य
निर्माण करण्याची शपथ घेतो काय आणि एकापेक्षा एक किल्ले जिंकत काही
बांधत गडपती होतो काय! ह्या पुण्यभूमीला अंकित करून स्वराज्य उभं करतो आणि
ह्या भूमीचा भूपती होतो काय! इथेच न थांबता सागरावर शतकोत्तर अधिराज्य
गाजवणाऱ्या पारंपारिक शक्तींना आव्हाने देत स्वतःचे बलदंड आरमार उभं करतो
काय आणि जळपती होतो काय! हे सारेच थक्क करणारे आणि महाराजांच्या
कर्तुत्वाला बहुरंगी, बहुढंगी आयाम चढवणारे आहे.
महाराजांचे हे
कर्तृत्व पटवून देताना एका डग्लस नामक इंग्रज अधिकाऱ्याचे उदगार सांगावेसे
वाटतात " शिवाजीमहाराज जन्माने खलाशी नव्हते ईश्वराची कृपा समजली
पाहिजे. जर ते खलाशी असते तर जमिनीप्रमाणे सागर सुद्धा त्यांनी
शत्रूपासून मुक्त केला असता!".
साधारणत: जावळी हस्तगत केल्यानंतर
महाराजांचे लक्ष तळकोकणाकडे वळले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले, कोकण
किनारपट्टीवर मोकळ्या ठिकाणी शत्रू मोक्याची ठाणे बळकावून बसला होता.
गोवा, वसई, रेवदंडा, मुंबई येथे पोर्तुगीज तर डच कोचीन जवळील काही भागात
सत्ता बळकावून बसलेत. अगदी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1608ला आलेले
इंग्रज मच्छलीपट्टण, मद्रास, हरिपूर बालासोर, हुबळी, सुरत, राजापूर
इत्यादी बंदरे बळकावून बसले होते. हे कमी की काय राजापूरच्या खाडीत
जंजिरेकर क्रूर सिद्दींनी कोकणातील काही भागावर सत्ता टिकवून धरली होती.
व्यापारीदृष्ट्या ही बंदरं खूपच महत्त्वपूर्ण होती .स्वराज्यातील किनारी
भागांना संरक्षण द्यायचे असेल तर ह्या भागात फक्त दुर्ग उभे करून चालणार
नव्हते तर फिरंग्यांच्या तोडीस तोड आरमार उभे करण्याची गरज होती, हे महराज
जाणून होते. कारण त्यावेळी भारतीय राजांकडे स्वतःचे आरमार नव्हते अगदी
इस्लामिक पातशहाला सुद्धा मक्केला जाण्यासाठी पोर्तुगीजांच्या परवान्याची
गरज लागायची. त्यामुळे पोर्तुगीजांचा असा समज झाला होता कि सागरावर आमचीच
मालकी आहे.आमच्या परवानगी शिवाय कुणीही समुद्रात पाय सुद्धा ठेऊ शकत नाही.
हेच त्या दूरदर्शी राजाच्या मनाला टोचत होते. म्हणूनच महाराजांची
स्वराज्याचा डाव विस्तारायचा ठरवला.यांत त्यांनी प्रथम कल्याण, भिवंडी,
ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, अंजनवेल, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, ही महत्वाची
बंदरे ताब्यात घेऊन तिथे जहाज बांधणीचे कारखाने खोलले.
बघता बघता हा
उदयॊग इतका वाढला कि सुरुवातीला दुर्लक्ष करणा-या परकीय सत्ताधीशांनी
मराठ्यांचे आरमार पाहून अक्षरश: तोंडात बोटे घातली! महाराजांचे नियोजन
इतके शास्त्रशुद्ध होते की भिंग लावून शोधले तरी त्यात त्रुटी सापडणार
नाही.
No comments:
Post a Comment