Followers
Monday, 25 May 2020
🚩🚩यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)🚩🚩
🚩🚩यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)🚩🚩
🚩🚩किल्ल्याची ऊंची :- १०००,
किल्ल्याचा प्रकार :- भुई किल्ले
डोंगररांग :- डोंगररांग नाही
जिल्हा : - जळगाव
श्रेणी : - सोपी
चोपडा - बुऱ्हाणपूर मार्गावर यावल हे गाव वसलेले आहे. सातपुड्यातील घाटवाटांवरुन येणारा माल या सपाटीवरच्या गावातील बाजारापेठत येत असावा. त्यामुळे या व्यापारी मार्गावर यावल आणि सातपुड्यात असलेल्या पाल या दोन्ही ठिकाणी किल्ले बांधलेले होते. यावल गावातून वहाणार्या नदीच्या काठावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर यावल किल्ला उभा आहे.
या किल्ल्याला निंबाळकर राजे किल्ला या नावनेही ओळाखले जाते.
पाल, यावल, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
पहाण्याची ठिकाणे :-
यावल गावातून एक रस्ता थेट न्यायालया पर्यंत जातो.
या न्यायालयाची इमारत किल्ल्याला खेटून उभी आहे.
न्यायालयापाशी पोहोचल्यावर डाव्या बाजूला किल्ल्याचे दोन भव्य बुरुज आणि तटबंदी दिसते.
किल्ल्याचे बुरुज व तटबंदी खालच्या बाजूला दगडात व वरच्या बाजूला विटानी बांधलेली आहे.
झुडूपातून जाणाऱ्या पायवाटेने २, दोन मिनिटे चढून गेल्यावर आपला उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश होतो.
पुढे वाट काटकोनात वळते आणि आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
गडाची अवस्था अतिशय खराब आहे.
गडावर झुडूपे माजलेली आहेत.
गडाचा उपयोग गडाखालच्या वस्तीकडून प्रातर्विधीसाठी केला जातो.
त्यामुळे गडावर फिरताना जपून फिरावे लागते.
गडावर उध्वस्त वास्तूंचे चौथरे आणि दोन दगडात बांधलेली पाण्याची कोरडी टाकी पाहायला मिळतात.
गडाला एकूण ७, सात बुरुज आहेत.
गड पाहाण्यासाठी १५, पंधरा मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :-
यावल जवळचे सर्वात मोठे गाव आणि रेल्वे स्टेशन भुसावळ येथे आहे.
भुसावळ - यावल अंतर १९, एकोणीस किलोमीटर आहे.
भुसावळहून एस. टी. बसने यावल गाठता येते.
यावल गावत न्यायालया जवळ किल्ला आहे.
राहाण्याची सोय :-
किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही.
जेवणाची सोय :-
यावल गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :-
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :-
वर्षभर🚩🚩
🙏संदर्भ : -
१,सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
२,डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
३,दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
४,किल्ले - गो. नी. दांडेकर
५,दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
६,ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
७,सह्याद्री - स. आ. जोगळेकर
८,दुर्गकथा - निनाद बेडेकर
९,दुर्गवैभव - निनाद बेडेकर
१०,इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
११,महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर🙏
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩मराठा🚩
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment