दुर्ग प्रकार : एका संक्षिप्त परिचय
भाग १
लेखनसिमा
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
आपण भारतीय ग्रंथांमध्ये दुर्गांचे वेगवेगळे आठ प्रकार पाहिले परंतु प्रामुख्याने जर बघायला गेले तर बाकीचे उपप्रकार मानून चार मुख्य प्रकारात दुर्गांची किंवा किल्ल्यांची विभागणी होते ते पुढील प्रमाणे.
1) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला
2) वनदुर्ग किंवा जंगली किल्ला
3) जलदुर्ग
4) स्थलदुर्ग किंवा भुईकोट किल्ला
* गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला
आता गिरिदुर्ग ह्या प्रकारा बद्दल आपण विस्तृत माहिती पाहूयात.
महाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या कोणालाही विचारा किल्ला म्हटले कि त्यास जर
प्रथम कुठल्या प्रकारची आठवण होत असेल तर तो डोंगरी किल्ला ह्या प्रकारातील
होय, कारण महाराष्ट्राला डोंगरी किल्ल्यांचे जणू वरदानच लाभले आहे. असा
दुर्ग किंवा डोंगरी किल्ला नेमका कसा असतो? त्याची बांधणी कशी असते आणि
त्याचे फायदे कोणते? हे आपण पाहणार आहोत.
दुर्ग प्रकारात भक्कम
अभेद्य आणि दुर्घट किंवा अवघड दुर्ग प्रकार म्हणून गिरिदुर्गाकडे पाहिले
जाते. कारण मुळातच उंच अशा डोंगरावर बांधला असल्याने तसेच
कड्या-कपाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याने गिरीदुर्ग या प्रकारास नैसर्गिक
संरक्षण
आपोआपच मिळते, महाराष्ट्रात प्रामुख्याने अशा प्रकारच्या किल्ल्यांची जणू शृंखलाच आहे.
जवळजवळ साडेतीनशे च्या आसपास डोंगरी किल्ले आपल्या महाराष्ट्रात
अस्तित्वात आहेत. असे म्हटले जाते की डोंगरी किल्ल्यावर शंभर सैनिक
पायथ्याकडील दहा हजार शत्रूंशी सहज सामना करू शकतात. उदा.रामशेजचा
किल्ला. हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जवळजवळ सात वर्षे
लढवला गेला तिथेच गिरिदुर्गा चे महत्व अधोरेखित होते.
इंग्रज
अधिकारी टोम निकल्स जेव्हा रायगडावर आला होता तेव्हा रायगड बघून त्याने
असे प्रतिपादन केले कि , "जर विपुल धनधान्य व शस्त्रसाठा रायगडावर असेल
तर ह्या किल्लावरून कमी सैन्यसह साऱ्या जगाशी लढू शकतो"
गिरिदुर्गाचे फायदे :
1) उंचीमुळे निसर्गातच किल्ला अभेद्य बनतो.
2) पायथ्याच्या शत्रूवर अचानक हल्ला करून परत किल्ल्यावर लपता येते.
3) तटबंदी, कोट, परकोट, बुरुंज यामुळे किल्ल्याला अधिकाअधिक अभेद्यता येते.
4) ज्याच्या हातात किल्ला त्या आसपासचा मुलुख, व्यापारी वाटांवर त्या राजाचे नियंत्रण राहते.
5)) राजपरिवार, खजिना, अष्टप्रधानमंडळ सुरक्षित राहते.
No comments:
Post a Comment