Followers

Monday, 18 May 2020

किल्ले बहिरवगड

वैभव महाराष्ट्राचे!

सह्याद्री पर्वतरांगेच्या मुख्य धारेवर घनदाट अरण्याने वेढलेला वनदुर्ग म्हणजेच किल्ले बहिरवगड, त्यास दुर्गचा भैरवगड असेही म्हणतात. सातारा - पाटण - हेळवाक - कोंढवळ - गोवारे मार्गे धनगरवाडा गाठून पुढे बहिरवगडावर जाता येते. तसेच कोकणातील चिपळूण - सावर्डे - तळवडे - पाठे पर्यंत गाडी मार्ग आहे. दुर्गवाडीतूनही चालत पाठे मार्गे बहिरवगडाला जाता येते.

बहिरवगडाच्या आधी एक मंदिर घाटमाथ्याच्या अगदी बाहेरील अंगाला आहे. मंदिराच्या पुढे पण घाटमाथ्यापासून अलग चिंचोळ्या डोंगरधारेनं जोडलेला बहिरवगड आहे. पुरातन जुने मंदिर पाडून पुर्णपणे नविन मंदिर बांधलेले आहे. मंदिरात भैरीदेवी, तुकाईदेवी आणी वाघजाईदेवी यांच्या मुर्ती आहेत. अंगणात तुळशी वृंदावन आणी शिवलिंग आहे. तसेच एका दगडावर प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही आहे. मंदिरा जवळ ओढ्यात पाण्याची विहीर आहे. देवदर्शन करून गड भटकंतीला जायचे.

मंदिरासमोरून उजव्या बाजूने खिंडीत उतरायचे आणी गडाला डावीकडून वळसा घातल्यावर उध्वस्त दरवाजातून गडप्रवेश होतो. पुढे तीन टप्प्यावर बुरूज दिसतात. गडाची तटबंदी बहुतांशी झाडीने झाकलेली आहे. गडावर घरांची जोती, पाणी टाकी, गुहा, ध्वजस्तंभ पहायला मिळतात. तसेच गडावर जास्त भटकंती करतात ते वन्यजीव! त्यांचा चांगलाच राबता गडावर असतो.
किल्ले बहिरवगड, ता. पाटण, जि. सातारा

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment