वैभव महाराष्ट्राचे!
महाराष्ट्र आणी मध्यप्रदेश यांच्या सीमारेषे जवळ किल्ले आमनेर हा सुंदर स्थलदुर्ग बांधलेला आहे. तापी नदी आणी गडगा नदी यांच्या संगमाच्या किनाऱ्यावर गड आहे, त्यास झिल्पी आमनेर असेही म्हणतात. भोकरबर्डी ह्या पायथ्याच्या गावत जाण्यासाठी अमरावती - परतवाडा मार्गे धारणी तालुका गाठायचा. धारणी मधून बुऱ्हाणपूरला जाण्यास गाडीमार्ग आहे. धुळघाटच्यापुढे गडगा नदी ओलांडली की भोकरबर्डी गाव आहे.
आमनेर गावात सध्या कोणीही रहात नाही. भोकरबर्डी गावातून
किल्ला साधारण ३ किमी अंतरावर आहे. भोकरबर्डी गावात गडगा नदीच्या
पाण्याच्या पातळीची व्यवस्थित चौकशी करूनच गडाकडे जावे. गडगा नदीचे पात्र
सावधपणे पार करून गडप्रवेश करता येतो. आमनेर या स्थलदुर्गाचे संपुर्ण
बांधकाम भाजक्या विटेत केलेले आहे. गडावर तटबंदी, बुरूज, विहीर, इमारती,
दरवाजा, तळघर, कोठार, चोर दरवाजा, देवड्या हे पहायला मिळते. नद्यांच्या
संगमाच्या टोकाकडील बाजूस असलेला पाकळी बुरूज फार सुंदर आहे. अशा प्रकारचा
बुरूज नळदुर्ग वरही पहायला मिळतो. सध्या गडाची अवस्था फारच बिकट आहे.
सर्वांगसुंदर आमनेर गडाच्या संवर्धनाची नितांत गरज आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment