Followers

Monday, 18 May 2020

किल्ले रांजणगिरी

वैभव महाराष्ट्राचे!

त्र्यंबकेश्वर रांगेच्या अगदी पुर्वेस रांजणगिरी उर्फ रांजण्या किल्ला आहे. नाशिक - जातेगाव - मुळेगाव अश्यामार्गे पोहचता येते. मुळेगावच्या जवळ जातेगावकडे जाताना उतरणार्‍या डोंगर धारेवर स्वार होउन किल्ल्याजवळील सुळक्यापाशी पोहचता येते. सुळक्याला उजवीकडे ठेउन वळसा मारून किल्ला आणी सुळका यांच्या मधिल घळीत पोहचतो. मातीच्या घसरणीवरून चढुन घळीवर जावे. येथून गडाचा छोटासा रॉक चढाई करून गडाच्या पायऱ्यांनवर जाता येते.

पायऱ्यांन पासुन थोडे वर चढले की समोर छोटा तलाव दिसतो, पण त्यात पाणी नाही. तलावाच्या थोडे पुढे पाण्याचे एक टाके आहे. गडमाथा खुपच अरूंद आहे. साधारणपणे २० ते २५ फुटच. माथ्यावरून सरळ दुसरे टोक गाठायचे, येथे माथा जरा विस्तृत आहे. यावर एक टाके असून यात देखील पाणी नाही. म्हणजे गडफेरीसाठी पाणी गावातूनच आणायचे.

गड अगदीच छोटा आहे. गडाच्या चढाईत खुपसारी करवंदाची जाळी आहेत. योग्य वेळेत गेल्यावर करवंदे मिळतात. गडावरून गडगडा, डांग्या सुळका, कावनई, अंजनेरी हा परीसर छान दिसतो.
किल्ले रांजणगिरी, ता. जि. नाशिक

# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:

Post a Comment