वैभव महाराष्ट्राचे!
नाशिकच्या सटाणा तालुक्यांत गडकोटांची रेलचेल आहे. त्यातच सटाणा शहराच्या जवळ कऱ्हेगड, दुंधागड, अजमेर असे किल्ले आहेत. सटाणाच्या पुर्वेस अजमेर सौंदाणे गाव आहे. हे गाव किल्ले अजमेर या गिरीदुर्गाच्या पायथ्याशी आहे. गडाच्या दक्षिण पायथ्याशी श्री क्षेत्र पहाडेश्वर महादेवाचे निसर्गरम्य मंदिर आहे. नंदी महाराजा सोंबत शिवशंभोचे दर्शन करून गड चढाई चालू करायची.
पहाडेश्वर मंदिराकडून गड चढाई करणे सोईचे आहे. गड चढताना तटबंदीचे, बुरूजाचे तुरळक
अवशेष दिसतात. गडमाथ्यावर सुरूवातीस आसमंताच्या छताखाली विराजमान शिवलिंग
आणी नंदी आहेत. तसेच गडमाथ्यावर तलाव, पाणी टाकी, घरांची जोती हे अवशेष
पहायला मिळतात. गडावरून परिसरातील साल्हेर, सालोटा, मोरा, मुल्हेर,
चौल्हेर, कऱ्हेगड, बिष्टा, दुंधागड, पिसोळगड, देरमाळ हे गड नजरेस पडतात.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment