वैभव महाराष्ट्राचे!
सह्याद्री मुख्य रांगेवर असलेल्या या सुळके वजा किल्यास जाण्यासाठी कोकणातील खोपोली - जांभुळपाडा मार्गे कळंब गाव गाठायचे. कळंब गावापासून डोंगराकडे जाताना आडवी येणारी नदी पार करून ठाकरवाडी गाठावी. ठाकरवाडीतून गड समोर दिसत असला तरी जंगलातून किल्ला आणी शेजारील डोंगर यांच्या मधील खिंडीत जाणारी वाट सापडणे महा कठिण.
अणघाई किल्ला हा सुळकाच असल्याने गडाच्या कातळात कोरलेल्या
खोबण्यांच्या आधारे गडामाथा गाठता येतो. आधारासाठी सोबत दोर ठेवणे फायदेशीर
होईल. माथ्यावर पाण्याची पाच टाकी असून दोन टाक्यातील पाणी पिण्यास योग्य
आहे. दाट जंगल आणी नाळेतील अवघड चढाईमुळे गड खुपच कठिण झाला आहे.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment