Followers

Friday, 15 May 2020

‘भामगिरी’ अथवा ‘भामेर’.

धुळे जिल्ह्यातील सगळ्या किल्ल्यांमध्ये अतिशय सुंदर असणारा किल्ला म्हणजे
‘भामगिरी’ अथवा ‘भामेर’...🚩
.
भामेर किल्ला हा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येतो एकेकाळी अहिर राजाची राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला आहे..
.
अहिर राजांची राजधानी म्हणून भामेर किल्ल्याची ओळख आहे या किल्ल्याने तीन बाजूंनी गावाला वेढले आहे तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे या किल्ल्यावर १८४ गुहा आहेत त्यापैकी काही गुहा पाहता येतात किल्ल्याच्या पठारावर पाण्याचे टाके व छोटेस मंदिर आहे किल्ल्यावरुन परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य अवर्णनीय असा हा किल्ला आहे १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करीत किल्ल्याचा ताबा घेतला १८२० मध्ये कालेखानने बंड करुन किल्ल्याचा आश्रय घेतला त्यानंतर कॅप्टन ब्रिग्जंने भामेर किल्ल्यावरील महत्वाच्या इमारतींची नासधूस करीत कालेखानचा पाडाव केल्याचे उल्लेख इतिहासात उपलब्ध आहेत..
.
प्राचीन काळी सुरत-बु-हाणपूर मार्गावरील वैभवशाली आणि संपन्न शहर म्हणून भामेर ओळखलं जात असे नाशिकला जाणारा व्यापारी मार्ग देखील याच शहरावरून जात असे धुळे-सुरत रस्त्यावरून भामेरकडे जाताना भामेर किल्ल्याच्या तीन डोंगरापैकी एका डोंगरावर ठरावीक उंचीवर कोरलेली लेणी आहेत त्याच्या उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मशीद आहे तर डाव्या हाताच्या डोंगरावर भामेर गडाचा “बालेकिल्ला” आहे बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या किल्ल्यावर मोठी यात्रा भरते..
.
✍️ 'सचिन पोखरकर'
फोटोग्राफी : बळवंत सांगळे सर...

No comments:

Post a Comment