Followers

Friday, 15 May 2020

तलवारबाजी पारंपारिक खेळ : #संक्षिप्त# विवेचन

तलवारबाजी पारंपारिक खेळ : #संक्षिप्त# विवेचन

संकलन #दिव्या_वराडकरtalwarbaji | Saamana (सामना)

पारंपरिक खेळ #शारीरिक आणि #मानसिक_बळ निर्माण करण्यासाठी उपयुक्त असा खेळ #तलवारबाजी. धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. अगदी पुराण काळातही हिंदू देवतांनी तलवार ‘#‘शस्त्र’’ म्हणून धारण केली आहे. देववाणी संस्कृतमध्ये तलवारीस खडग, तीक्ष्णवर्म, विषसन, श्रीगर्भ अशी अनेक संबोधने आहेत. इ.स.पूर्व ६०० पासून ते १९ व्या शतकापर्यंत जगातील विविध भागात तलवारीचा प्रसार झाल्यामुळे, तिला वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. उदा. उर्दूत :- समशेर, पंजाबीत:- तेगा, कानडीत:- कत्ती, नेपाळीत:- दाओ कारा, इंग्रजीत:- स्वॉर्ड तलवार हे शौर्याचे प्रतिक समजले जात असे. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत. पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. प्रारंभ काळात तलवारीच्या पात्याचा आकार कण्हेरीच्या पानासारखा असल्यामुळे पात्यास पान असेही म्हटले जाते. सामान्यपणे पात्यावरूनच तलवारींचे वर्गीकरण केले जाते. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते. मुठीचेही विविध प्रकार आढळतात. अश्मयुगातील दगडी धारदार आयुधापासून तलवार उत्क्रांत झाली असावी. महाभारताच्या शांतिपर्वात ब्रहयाने यज्ञ केला असता ‘अशना’ या कमलासारख्या उल्केतून तलवारीचा जन्म झाला, असे भीष्म सांगतात. शस्त्रास्त्रांचा विकासक्रम लक्षात घेता गदा, कुऱ्हाड, गोफण, धनुष्यबाण व भाला यानंतरच तलवार प्रचारात आली असावी, असे दिसते. तलवारीला तांबे, कासे यांची पाती आणि हाडांच्या व धातूच्या मुठी बसवीत. यजुर्वेदसंहितेत मात्र लोखंडी आयुधांचा स्पष्ट निर्देश आहे.

आधुनिक काळात प्रदेश, गाव किंवा विशिष्ट व्यक्तीवरून तलवारी ओळखल्या जातात. उदा : आलेमानी (जर्मनी), मुल्हेरी (मुल्हेर, महाराष्ट्र), हुसेनी, भवानी वगैरे. शुंगकालातील सरळ, रुंद दुधारी व बिनमुठीच्या (?) तलवारींचे स्वरूप भारहूत येथील शिल्पकामात आढळते. वाकाटककालीन अजिंठा लेण्यांत दिसणारी तलवार ही टोकाला रुंद असलेल्या पात्याची दिसून येते. तिचे बामियान (अफगाणिस्तान) येथील बुद्धाच्या पाठीमागे असलेल्या चंद्रदेवाच्या तलवारीशी साम्य आहे. कोपीस म्हणजे मुठीखाली अरुंद पण टोकाकडे रुंद होणारे पाते असलेल्या तलवारींचे नमुने जावा–सुमात्रा येथील मंदिरशिल्पांत आहेत खुरपी तलवारी (कुकरी, नायर) आजही केरळमध्ये आढळतात. वीरगळांच्या हातांतील तलवारी खंडा किंवा खुरपी धर्तीच्या आढळतात. कर्नाटकात ‘आद्य–कट्टी’ नावाची तलवार आढळते. हिचे पाते कोयत्यासारखे असते. टिपूचे सैनिक आद्य–कट्टी वापरीत. नेपाळात खंडा, कोश व कुकरी या प्रकारच्या तलवारी प्रचारात होत्या. या खेळामध्ये वापरली जाते ती तलवार. तलवार एक प्राचीन व परंपरागत शस्त्र. धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत. तलवारीच्या मारामुळे होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी ढाल व चिलखत यांचा उपयोग होतो. शत्रूच्या तलवारीचे वार स्वतःच्या तलवारीवर झेलून किंवा चुकवून आत्मरक्षण करण्याची प्रथा आहे. पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते. पूर्वी तलवारीशी लढा होता तेव्हा सर्व योद्धांना तलवारीने लढण्याची क्षमता आवश्यक होती. आता भारतात बनावट तलवारीची लढाई सुरू आहे जी मुहर्रम उत्सवांवर पाहायला मिळते, परंतु हा बनावट लढा परदेशातही चांगला खेळ झाला आहे, ज्याला इंग्रजीत फेसिंग म्हणतात. हा शब्द खरंतर इंग्रजी "डिफेन्स" मधून आला आहे, ज्याचा अर्थ संरक्षण आहे. आजकाल, फेसिंग हा एक चांगला खेळ मानला जात आहे आणि #ऑलिम्पिक_खेळांमध्ये सामना करणे आवश्यक आहे. तलवारबाजीमध्ये दोन प्रकार जास्त दिसतात. एक म्हणजे दांडपट्टा आणि दुसरी साधारण तलवारबाजी, ज्यात साधारणपणे तलवारीऐवजी लाठी वापरली जाते. दांडपट्टय़ामध्ये पोलादाचा एक पातळ पट्टा असतो. त्याला पकडण्यासाठी मूठ बनवलेली असते. त्या मुठीमध्ये हात घालून पकडले जाते. प्रात्यक्षिक म्हणून ९ हातांवरील लिंबू किंवा १२ हातांवरील लिंबू, म्हणजे ९ फूट किंवा १२ फूट अंतरावर लिंबू ठेवून तो उडवला जातो. तर तलवारबाजीमध्ये दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना मारत आणि स्वतःला वाचवत ही कला दाखवतात. तलवारबाजी ही कला आता बहुतांश लुप्त होत चालली आहे. त्यामुळे आता या कलेचा समावेश शाळांमधील खेळांमध्ये करण्यात आला आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज एक महान योद्धा होते. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत शहाणपणाने आणि चतुराईने आपल्या शत्रूंचा सामना केला. त्यांच्या रणनीतीने उत्कृष्ट योद्ध्यांचा पराभव केला. रणधुरंधर प्रथम बाजीराव पेशवे यांनी आपल्या कुशल युद्धाच्या नेतृत्वात उत्तर भारतात स्थापलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमांचा विस्तारही केला. 'वेगवान वेगाने झगडणे' हा त्यांच्या युद्धाच्या कौशल्याचा एक महत्त्वाचा भाग होता. पूर्वी तलवार चालविण्याच्या शिक्षणाचा प्रारंभ फरीदग्याने होई. फरीदग्यानंतर तलवार बंदेश (वार आणि डावपेच) लाकडी तलवारीने शिकविले जात. तलवार व पट्टा यांचे तडफी, सरका, डुबी, काटछाट, हूल, गर्दनकाट इ. बंदेशांचा सराव केळीच्या खांबावर केला जाई. महाभारतात बावीस बंदेश सांगितले आहेत. तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामड्याचे किंवा धातूचे म्यान असते. हे म्यान कमरेला अडकविण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात. सध्या परंपरा राखण्यासाठी तसेच लष्करी व पोलीस संचालने आणि राष्ट्रीय समारंभप्रसंगी लष्करी पोलीस व अधिकारी तलवारी वापरतात. लष्करी आणि पोलीस प्रबोधिनी शिक्षणात उच्च क्रमांकित सैनिकांना वा अधिकारी वर्गास ‘सन्मान तलवार’ प्रदान करण्याची प्रथा आहे.

धाडस, #सावधानता, #चपळपणा या तीनही कौशल्यांचा अपूर्व संगम या खेळात होतो. स्वरक्षणासाठी मुलींनी हे खेळ शिकून आत्मसाथ केलेच पाहिजेत. त्यामुळे एक #आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये #निर्भीडपणा येतो.

लेखनसीमा : संकलन इति लेखनसीमा संकलन #दिव्या_वराडकर

संदर्भ :

मराठी विश्वकोश

Fencing Technique of foil

भारतीय हस्तशिल्प

प्रतिमा स्त्रोत: टॅपली ग्लोबल लायब्ररी, एगरटोन

No comments:

Post a Comment