Followers

Sunday, 3 May 2020

#शिवशस्त्रगाथा. #ढाल

#शिवशस्त्रगाथा.
#ढाल
 संतोष चंदने।चिंचवड ,पुणे.
वेध इतिहासाचा.













ढाल... लढाईतील संरक्षणाचे एक महत्वाच साधन.
ढाली जास्त करून कातडीच्या बनवलेल्या असतात. यात गेंडा, उंट,म्हशी, हत्ती या प्राण्यांची असतात .तसेच काही लोखंडाच्या व पोलादाच्या धातू पासून बनवलेल्या असतात.
काही ढालींवर ह्या सोन व चांदीच काम केलेल दिसत.
अशा सोनं व चांदीच काम केलेल्या ढाली ह्या र‍ाजा महाराजांच्या महालात पाहायला मिळतात.
सुंदर सोन्याच नक्षीकाम केलेल्या ढालीत रिवाजाप्रमाणे नजराणा दिला जायचा. अाशा ढालीच्या मागच्या खोलगट भागात रेशमीवस्त्र ठेउन त्यात नजराण्याचा जिन्नस ठेवला जायचा.व तो नजराणा ढाली सकट द्यायचा असा रिवाज होता.
फार पौराणिक काळा पासून ढाली चा उल्लेख बघायला मिळतो. ढालीचा #चर्म असा उल्लेख सापडतो.
श्रीदुर्गासप्तशती ग्रंथात देवी माहात्म्य मध्ये महिषासुराच्या वधासाठी तिन्ही देवांच्या तेजातून निर्माण झालेले तेज एक होऊन नारीरुप बनले.
सर्व देवदेवतांनी त्या शक्तीला आपआपले शस्त्र दिले. या मध्ये तीला काल(मृत्यु) देवाने तिला खड्ग व नितळ #ढाल दिली.तर शुंभनिशुंभाच्या युध्दात देवीने या असुराची अष्टचंद्राकार ढाल छिन्नविछिन्न करुन त्याचा वध केला.
ढाल जो पर्यंत तुमच्या हातात आहे तो पर्यंत तुम्ही सुरक्षित राहू शकता.
सिंहगडाच्या लढाईत तान्हाजी मालुसरे यांची ढाल तुटली होती असे उल्लेख सापडतात.
लढाईत ढाल व तलवार घेऊन गेलेला मावळा शत्रुचे वार या ढाली वर झेलत असतो.
ढाल हातात पकडाच्या कशा त्याची बांधणी कशी असते हे ढाल पाहील की लक्षात येत.
इतर वेळेला बराचदा ही ढाल पाठीवर बांधलेली दिसते. ती पाठीवर सहज बांधून जवळ बाळगता येत असलीवतरी पाठीवर वार करणारे काही कमी न्हवते. नकळत कुणी पाठीवर वार केला ,बाण चालवला तर पाठीवरची ढाल तो वार आपल्या अंगावर घ्यायची.
शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्रात ती ढाल पाठीवर दाखवली आहे तर संभाजी महाराजांच्या चित्रात त्यांनी ती ढाल पट्याने गळ्यात तिरकी अडकवून खाली सोडली आहे.
कासवाच्या पाठीची ढाल एखाददुसरी असते. अशी ढाल मी बडोद्याला 'शस्त्रप्रतापगार ' या संग्राहलयात पाहीली आहे.
ढालींवर चार फूलां सोबत चंद्र व सुुर्य ही पाहायला मिळतात.
काहींवर कलम आयात ही लिहलेले असतात.
जे काही श्लोक लिहलेले असतात त्याची ताकत प्रभाव या ढालीवर पडत असतो.
अनेक खेळांसाठी ढाल ही गौरव करण्यासाठी दिली जाते. या ढाली वरून बोली भाषेत आनेक वाक्रप्रचार पण आले आहेत.
शिवकाळात ही अशीकाही पराक्रमी माणस होत की त्य‍ांनी महाराजांना वेळोवेळी ढाल बनून महाराज‍ांना आनेक प्रसंगातून सुखरूप बाहेर काढल आहे.
सालारजंग नॅशनल म्युझिअम
केळकर संग्राहालय व आनेक शस्त्र संग्राहालयात ढाली पाहायला मिळतात.
चामड्या पासून बनवलेल्या ढालींना आकार देण्याचा दगडाचा साचा हा अश्वमेघ संग्रालय टिटवाळा येथे आहे.

"फेसाळलेल्या समुद्रा कडून पिसाळलेली आयाळ घ्यावी,
अन् सह्याद्रीच्या कड्यांमधूनी #ढाली सारखी छाती घ्यावी."

No comments:

Post a Comment