Followers

Monday, 4 May 2020

किल्ले व त्यांचे अंग भाग - १

किल्ले व त्यांचे अंग
भाग - १

सह्याद्री हा महाराष्ट्रभूमीचा अनमोल दागिना. याच अनमोल, अफाट, बेलाग आणि राकट सह्याद्रीच,
सह्याद्रीतील गिरीशिखरांचं आणि गिरीशिखरांवर असलेल्या पावन-पवित्र गडकोंटाच , इथल्या जाज्वल्य इतिहासाशी अतूट अस नात आहे. याच सह्याद्रीतील गडकोट किल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते उंच, प्रचंड, दुर्गम डोंगर, वेड्यावाकड्या, उंचच उंच डोंगररांगा आणि अफाट, बेलाग सह्याद्री. याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, अंगाखांद्यावर, कड्या कपारीत असंख्य गड आजही ताठ मानेने, घट्ट पाय रोवून, आपल्या पूर्वजांच्या स्मृती आळवत, मुक्याने, जर्जर अवस्थेत परंतु तेवढ्याच अभिमानाने, स्वाभिमानाने, इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
खरतर सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांतिल गडकिल्ल्यांची दुर्गमता हाच त्या गडांची खरी ओळख, परंतु डोमगर नुसते दुर्गम असले, दुर्गम असले तरी या दुर्गांची बांधणी करताना इतरही बऱ्याच गोष्टी लक्षात घेतलेल्या दिसून येतात. जसे
की आसपासची भौगोलिक रचना, स्थान - निश्चिती , संरक्षणात्मक बाजू, गडाची बांधणी  संरक्षण, मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू विचारात घेऊनच दुर्गबांधणी केली जात असे. महाराष्ट्रातील इतिहासाबरोबरच इथल्या दुर्गांची बांधणी हा एक अभ्यासाचाच वेगळा विषय आहे. वेगवेगळ्या कालखंडात इथे अनेक राजवटी
नांदल्या, आणि या वेगवेगळ्या कालखांडात इथे भरपूर गडकिल्ल्यांची उभारणी केली गेली. किल्ले  उभारताना
वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, कल्पकतेने निरनिराळे प्रयोग राबवून या दुर्गांची उभारणी केल्याचे आपल्याला दिसून येते.
आज महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा विचार केला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड, शिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर /गड आपले लक्ष वेधून घेतो, इथे उंच डोंगरमाथ्यावर गिरिदुर्ग आहेत, इथे घनदाट अरण्यातील वनदुर्ग आहेत, इथे भक्कम तटबंदीने वेढलेले कणखर भुदुर्ग/भुईकोट आहेत आणि इथेच
सागराच्या लाटांचे तडाखे झेलत त्याच्याशीच गुजगोष्टी करणारे जलदुर्गही आहेत. इतकी वैविध्यपूर्ण, वैभवशाली दुर्गसंपत्ती असलेला हा महाराष्ट्र. गडकिल्ल्यांबरोबरच इथे भक्कम तटाबुरूजांचे वैभवशाली वाडे-राजवाडे, गढ्या ,
विहिरी, बारवा, समाध्या, गावांच्या वेशी, पुरातन मंदिरे, आदी भरभरून ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रचनेच्या आणि बाांधकाम शास्त्राच्या दृष्टीने अभ्यासनीय आणि अनमोल असाच आहे.

क्रमशः

No comments:

Post a Comment