दक्षिण दिग्विजयानंतर शिवाजी महाराजांनी नव्याने ज्या वास्तु बांधल्या त्यासंबंधी जैस्वीट फादर्स या लेखकाने केलेल्या काही नोंदी.
इ.स १६७० च्या पत्रात तो लिहितो
जुलमी शिवाजीने जिंजीचे राज्य घेतल्यावर आणि एक वर्ष वेढा घालुन वेलोरचा
किल्ला घेतल्यावर हिंदुस्थानातील मुसलमानांचे बळ लक्षात घेऊन. भविष्यकाळी
त्यांच्या सर्व एकवटलेल्या सामर्थ्याचा प्रतिकार करता यावा म्हणुन त्याने
बंदोबस्त करण्यास सुरवात केली आहे. मुसलमानांना या राज्यातुन घालवुन देताना
शिवाजीने त्यांच्या मशिदींचा अपमान आणि भ्रष्टाचार केला होता. यामुळे
तूर्त जरी त्याला भीती नव्हती तरी पुढची तरतूद करणे आवश्यक होते. आपला
उद्देश सिद्दीस नेण्याकरिता निसर्गतः दुर्लभ असलेल्या जिंजी किल्ल्याची
पुन्हा त्याने डागडुजी केली.
पहिले तट पाडून नवे तट असे
कौशल्याने बांधले की , ते काम हिंदी लोकांचे नसुन युरोपीयांचे असावे असे
वाटते. काही जुने निरूपयोगी किल्ले पाडुन त्याने कित्येक भुईकोट आणि डोंगरी
किल्ले बांधले. पाश्चात्यांच्या पद्धतीचे अवलंबन करून त्याने मोठे खडक
फोडले , तलाव बांधले आणि युद्धोपयोगी इतर इमारती रचल्या. या कारखान्यावर
त्याने आपल्या प्रजेकडुन जुलूम करून जमवलेली अपार संपत्ती खर्ची केली.
वरील माहिती वरून असे दिसते शिवाजी महाराज चांगल्या कुशल लोकांची मदत आपल्या बांधकामात घेत होते.
शिवाजी महाराज फोर्ट सेंट जॉर्जच्या प्रेसिडेंट ला २२ सप्टेंबर १६७७ ला लिहितात :
मी कर्नाटकात आल्या पासुन अनेक किल्ले जिंकले. कित्येक किल्ल्यात मला
नवीन बांधकाम करायची आहेत. मोठ्या तोफांचे गाडे कसे करावेत आणि सुरुंग कसे
लावावेत हे जाणणारी माणसे तुमच्याकडे असतील तर आम्हाला अशा लोकांची आणि
विशेषतः सुरुंग लावुन दगडी भिंत उडवणाऱ्या कसबी लोकांची जरुरी आहे.
गोव्याहुन व वेंगुर्ल्याहुन आलेले सर्व लोक कामामध्ये खपुन जाऊन
जेव्हा त्यांच्याकडे मी आणखी माणसांची विचारणा केली तेव्हा ते सर्व
चिनापाटण आणि पुलीकतक गेल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा आपल्याकडे तिकडे
२० ते २५ किंवा निदान १० ते ५ सुरुंगे लोक मिळतील ते पाठवावे. त्यांना
चांगला तनखा देऊन माझ्या किल्ल्यावर काम देईन.
स्वराज्याचे वैभव
No comments:
Post a Comment