Followers

Thursday, 7 May 2020

भीमा काठी वसलेलं सुंदर असे पुरातन श्री.सिद्धेश्वर मंदिर🚩 माचणूर(सोलापूर)












भीमा काठी वसलेलं सुंदर असे पुरातन श्री.सिद्धेश्वर मंदिर🚩
माचणूर(सोलापूर)

ह्या मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर इ.स. १६९५ मध्ये औरंगजेब ने माचणूर चा भुईकोट किल्ला बांधला आहे, इथं बसून औरंगजेब न्यायदान करत असे;

या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.

No comments:

Post a Comment