Followers

Thursday, 7 May 2020

!!विद्याशंकर मंदीर!!











!!विद्याशंकर मंदीर!!
कर्नाटक राज्यात श्रींगेरीला विद्याशंकरा मंदिर आहे. १३५७-५८ च्या काळात विजयनगर साम्राज्याच्या वेळेस ह्या मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे.

हे मंदिर होयसळ आणि द्रविडी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. भारतातील इतर मंदिरा प्रमाणे ह्याचं बांधकाम, कलाकुसर ह्यावर लिहायला घेतलं तर शब्द कमी पडतील इतकी सुंदर ह्याची रचना आहे.

पण इकडे दोन गोष्टी भारतातील विज्ञान, तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास आजही आपल्याला दाखवतात. पहिलं म्हणजे इकडे असलेली १२ राशी खांबांची रचना.

इथल्या पूर्वे कडील मंडपात १२ खांब असून ह्यातील प्रत्येक खांब हा प्रत्येक राशीला वाहिलेला आहे. प्रत्येक खांबावर त्या त्या राशीला दर्शवणाऱ्या चित्रांची कलाकुसर केलेली आहे.

पण ह्यांची रचना अश्या पद्धतीने केली आहे की सूर्य ज्या राशीत असेल त्या राशीच्या खांबावर त्या वेळेला सूर्याची किरणे पडतील. सूर्याच्या एका वर्षातील पूर्ण भ्रमणाचा अभ्यास करून तो कोणत्या राशीत कधी असेल ह्याचं गणित करून तसेच किरणे कश्या पद्धतीने प्रवेश करतील ह्या सगळ्यांची आकडेमोड करत त्याला कलेची, श्रद्धेची साथ देण्यात आली आहे.

१२ खांबाच्या मध्ये गोलाकार रेषेत लाईन्स असून त्यावर सूर्याची सावली कशी पडेल हे दर्शवण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंडपाच्या बाहेर असणारी आणि आजही दिसणारी दगडी चेन.

ह्या चेन मध्ये अनेक लूप एकमेकात अडकवले असून ही चेन जणू काही छताच्या दगडाला वेल्डिंग करून चिकटवलेली आहे. दगडाचे वेल्डिंग होऊ शकते ह्यावर आपण आज विश्वास ठेवू शकणार नाही.

पण त्याकाळी रॉक मेल्टिंग टेक्नोलॉजी सारखं तंत्रज्ञान अस्तित्वात असल्याशिवाय ह्या दगडी चेन ची निर्मिती अशक्य आहे.

परकीय आक्रमणात ह्या दगडी चेन नष्ट केल्या गेल्या पण त्या बनवण्याचं तसेच त्यांना मुळ बांधकामाशी जोडण्याचं तंत्रज्ञान मात्र परकीय चोरून नेऊ शकले नाहीत.

काळाच्या ओघात रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजी नष्ट झाली असली तरी ही दगडी चेन भारतीय संस्कृतीच्या तंत्रज्ञानातील प्रगती मधील एक मैलाचा दगड आहे.

ताजमहाल च्या सौंदर्यामध्ये कला असेल तर ह्या दगडी चेन असलेल्या मंदिरात कलेचा आत्मा आहे कारण ते बनवताना किती बारीक, सारीक गोष्टींचा विचार केला गेला असेल हे कळण्यासाठी कशी बनवली गेली असेल ह्याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करावा.

No comments:

Post a Comment