रायगडाची गडस्वामिनी म्हणजे श्रीशिर्काईदेवी. शिर्क्यांची देवी. गडावर काही संकट आल्यास शिर्काईदेवीची यात्रा करायची असा रिवाज होता. शिर्काईदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा होत असे. नवरात्रोत्सवात देवीपुढे ९ दिवस किर्तन चाले.
दसऱ्याला सीमोल्लंघनाचा उत्सव रायगडावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे. सीमोल्लंघन झाल्यानंतर तोफांचे बार काढले जात असत. जमलेल्या मंडळींस पानसुपारी दिली जायची. यावरून लक्षात येते की नवरात्रोत्सव रायगडावरील महत्वाचा उत्सव होता. संदर्भ- रायगडची जीवनकथा – शां. वि. आवळस्कर
No comments:
Post a Comment