Followers

Thursday, 7 May 2020

#ओर्छा_दुर्ग #ओरछा_किला #Fort_of_Orchha

नमस्कार.... मित्रानों.... आज आपण महाराष्ट्राबाहेरील मराठा अधिराज्यात असलेल्या किल्ल्याला व नगराला भेट देणार आहोत. एक असे नगर जी क्षत्रिय राजपूत बुंदेल्यांची पहिली राजधानी व पेशव्यांच्या जहागीर होती.
चला पाहुया.........

#ओर्छा_दुर्ग
#ओरछा_किला
#Fort_of_Orchha

#माहिती :-  - इतिहासप्रेमी रितेश ठाकूर (जय महाराष्ट्र)



















ओरछा हे ऐतिहासिक शहर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील बुंदेलखंड विभागातील बेतवा व जामनी या नदीच्या संगम किनारी आहे. ते झाशीपासून सुमारे १५ किलोमीटर दूर आहे. दिल्ली वरून भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस द्वारा येथे पोहचू शकतो. हवाईमार्गे खजुराहो विमानतळ जवळ आहे. महामार्ग व लोहमार्गाद्वारे ओरछा जोडले गेले आहे.

#इतिहास :-

ओरछाचा इतिहास १५ व्या शतकांपासून सुरू होतो. ह्या नगराची स्थापना ओरछा राजा रूद्रप्रताप सिंह जू देव बुंदेला यांनी केली. सन् १५०१ साली वीर सिंह ने दगड, वीट आणी गारा पासून ओरछाचा किल्ला बांधला. किल्ल्यात अनेक मंदिर व महाल आहेत. तसेच सर्वात जास्त बुंदेला राजघराण्याचे येथे जास्त राज्य होते. बुंदेला राजघराण्याची पहिली राजधानी ओरछा होती. नंतर राजा छत्रसाल बुंदेलांच्या काळात पन्ना ही राजधानी झाली. ओरछा व बुंदेलखंड हा मराठा साम्राज्यात अधिन होते.

#राजा_महाल :-

हा महाल राजा मधुकर सिंह बुंदेला यांनी १५५४-१५९१ या शासनकाळात बनवला. राजा महल १७८३ पर्यंत अनेक राजा व राणींचे निवासस्थान होते. सोळाव्या शकतात बनलेला हा महाल अतिशय साधारण रूपात बनवला आहे. महालाच्या आतील कक्षात देवी देवता, पौराणिक पशू व लोकांचे नक्षीदार चित्र आहेत. महालाच्या वरच्या छतावर व भिंतीवर दर्पणाचे निशाण दिसते. महालाच्या खिडक्यांची निर्मिती अशी केली आहे की, सूर्याची किरणे आत आल्यावर महालाच्या आतील तापमान वेग वेगळे होतात. महालाच्या आतील भिंतीवर भगवान विष्णूंचे चित्र आहेत. या महालाचे अनेक गुप्त मार्ग आहेत.

#शीश_महाल :-

१७०६ साली महाराजा उद्देत सिंह यांनी या महालाची निर्मिती केली. विभिन्न रंगीत काचांचा उपयोग करून हा महाल सुंदर बनवला आहे. म्हणून महालाला शीश महाल म्हणतात. कालांतराने महालाची डागडुजी करण्यात आली. आता हे महाल एक प्रशस्त हॉटेल बनले आहे.

#जहाँगीर_महाल :-

हा महाल बुंदेला व मुघल यांच्या मैत्रीचा प्रतिक आहे. बादशहा सलीम जहाँगीर ने ओरछा राज्याचा अधिकार वीर सिंह जू देवा याला दिले तेव्हा त्याने सन् १५१८ साली परम मित्र बादशहा जहाँगीरसाठी हे महाल बांधले. महालला पुर्व व पश्चिम दरवाजे आहेत. सध्या पुर्व दरवाजा बंद आहे. प्रमुख दरवाजा बेतवा नदीकडे उघडते. व हा महालात १३० खोल्या आहेत.

#रामराजा_मंदिर :-

ह्या मंदिरा बद्दल खुप सुंदर अख्खायिका आहे. सन् १५५४-९२ साली मधुकर शहा बुंदेला यांच्या कार्यकाळात त्यांची राणी गणेश कुंवर बाईसाहेब यांनी अयोध्याला चालत जाऊन बालस्वरूप श्री राम (राम लला) यांची मुर्ती घेऊन आली. राणीसाहेब ग्वाल्हेरच्या करहिया गावातील परमार राजपूत होती. रात्र झाल्याने काही वेळासाठी भगवान श्री रामांची मुर्ती महालाच्या भोजन कक्षात ठेवण्यात आली. पण मंदिर बनल्यानंतर कोणच त्या मुर्तीला हलवू शकले नाही. देवाचा चमत्कार समजून महालाचे मंदिरात रुपांतर केले. आणी "रामराजा मंदिर" असे नाव दिले गेले. रामनवमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. रामांची मुर्ती महालाच्या दिशेने असल्याने येथे श्री रामांना राजा मानले जाते. मंदिरात चामड्यांच्या वस्तूला निषेध आहे.

#राय_प्रवीण_महाल :-

हा महाल राजा इंद्रमणी यांची प्रिय सुंदर गायिका प्रवीणराय यांच्यासाठी बनवले होते. ती एक सुंदर कवयित्री व गायिका होती. बादशहा अकबरला तिच्या सुंदरतेबद्दल समजले तेव्हा त्यांनी प्रवीणरायला दिल्लीला बोलवले. पण इंद्रमणी यांच्यासाठी तीचे खरे प्रेम पाहून बादशहा अकबराने तीला ओरछाला परत पाठवले. हा दोन माळ्याचा महाल नैसर्गिक बाग व झाडांनी सजलेला आहे. येथे लघू हॉल व चेंबर आहे.

#लक्ष्मीनारायण_मंदिर :-

हे मंदिर १६२२ साली राजा वीर सिंह जू देव यांनी बांधला होता. मंदिर ओरछा गावाच्या पश्चिमेला एक पर्वतावर आहे. मंदिरात सोळाव्या व सतराव्या आणी एकोणिसाव्या शतकातकाचे चित्र बनवले आहे. चित्रांचे रंग व चित्र इतके जीवंत आहेत की ते नुकताच बनवले आहे असा भास होतो. मंदिरा प्रसिद्ध "झाशीची लढाई" आणी "भगवान श्रीकृष्ण" यांचे चित्र आहे.

#चतुर्भुज_मंदिर :-

राज महालाच्या जवळ असलेले हे मंदिर चार भुजाधारी भगवान श्री विष्णूला समर्पित आहे. या मंदिराची निर्मिती १५५८-१५७३ मधे राजा मधुकर सिंह बुंदेला यांनी केली.

#फुलबाग :-

बुंदेला राजांनी बनवलेला हा फुलांचा बगिचा आहे. चारी बाजूला तटबंदी आहे. फुलबागच्या भूमिगत एक महाल व आठ स्तभांचा मंडप आहे.

#सुंदर_महाल :-

राजा जुझार सिंह यांनी त्यांचे पुत्र राजा धुरभजनसाठी महालाची निर्मिती केली. धुरभजनाला एका मुस्लिम मुलीशी प्रेम होते. त्यांनी लग्न केले. व त्यांनी वैभवी जीवन सोडले. व भक्ती आणी ध्यान मध्ये लीन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर लोक त्यांना महान साधू संबोधू लागले.

#मराठा_साम्राज्य :-

सन् १७३१ साली राजा छत्रसाल बुंदेला यांनी मृत्यू अगोदर बुंदेलखंडचा तिसरा हिस्सा मराठ्यांना जहागीर म्हणून दिले होते. सन् १७४२ इ.स पुर्वी झांसी हे ओरछा राज्याच्या अधिन होते. बुंदेला व मराठा यांच्या युध्दात मराठा सेनापती नारोशंकरांनी ओरछाचे राजा पृथ्वी सिंह यांचा पराभव केला. व पृथ्वी सिंहला बंदी बनवले गेले. आणी ओरछा व झांसी हे स्वतंत्र राज्य निर्माण करून झांसी मराठा साम्राज्यात विलीन केले. तसेच ओरछा नरेश पृथ्वी सिंहकडून दहा लाख रुपये दंड वसूल केले. म्हणून ओरछाचे बुंदेला हे मराठा पेशवा व झांसीचे नेवालकर राजघराण्याचे द्वेष करीत होते. परिणामी अपमानाचा व झाशी हडपण्याचा बदला म्हणून सप्टेंबर, अॉक्टोबर १८५७ साली ओरछा राणी लडाई सरकार यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबत युध्द केले. परिणामी ओरछाचा पुन्हा पराभव झाला.

#ओरछा_बुंदेला_शासक :-

*राजा रूद्र प्रताप सिंह बुंदेला (१५०१-१५३१)
*राजा भारतीचंद्र सिंह बुंदेला (१५३१-१५५४)
*राजा मधुकर शहा बुंदेला (१५५४-१५९२)
*राजा राम शहा बुंदेला (१५९२-१६०६)
*राजा वीर सिंह जू देव बुंदेला (१६०५-१६२६)
*राजा जुझार सिंह बुंदेला (१६२५-१६३५)

{ राजा हरदौल यांचे बंधू होते.}

*राजा देवी सिंह बुंदेला (१६३५-१६४१)

{ जुझार सिंह यांचे बंधू होते. }

*राजा पहाड सिंह बुंदेला (१६४१-१६५३)
*राजा सुजन सिंह बुंदेला (१६५३-१६७२)

{महाराजा छत्रसाल बुंदेला यांच्या अधिन हे राज्य होते. राजा छत्रसालांनी १७९५ साली पन्ना ही राजधानी बुंदेल्यांची दुसरी राजधानी बनवून स्वतः चा राज्याभिषेक केला.}

*राजा इंद्रमणी सिंह बुंदेला (१६७२-१६७५)
*राजा जसवंत सिंह बुंदेला (१६७५-१६८४)
*राजा भगवत सिंह बुंदेला (१६८४-१६८९)
*राजा उद्दवत सिंह बुंदेला (१६८९-१७३५)
*राजा पृथ्वी सिंह बुंदेला (१७३५-१७५२)

{ सन् १७४२ साली मराठा सरसेनापती नारोशंकरांनी पृथ्वी सिंहचा पराभव केला. आणी झांसी हे ओरछा पासून वेगळे केले. तसेच ओरछा नरेश कडून दहा लाख रुपये दंड वसूल केले.}

*राजा सामंत सिंह बुंदेला (१७५२-१७६५)
*राजा हतीसिंह बुंदेला (१७६५-१७६८)
*राजा मान सिंह बुंदेला (१७६८-१७७५)
*राजा भारती सिंह बुंदेला (१७७५-१७७६)

#ब्रिटिश_राज_बुंदेला_शासक :-

*राजा विक्रमजीत महेंद्र (१७७६-१८१७)
*राजा धरमपाल सिंह बुंदेला (१८१८-१८३४)

{ यांची विधवा राणी महाराणी लडाई सरकार होती.}

*ताज सिंह बुंदेला (१८३४-१८४२)
*सुरजन सिंह बुंदेला (१८४२-१८४८)
*हमीर सिंह बुंदेला (१८४८–१८६५)
*महाराणी लडाई सरकार बुंदेला (१८६५-१८७४)

{ ओरछा व झांसीच्या फाळणीचा बदला म्हणून महाराणी लडाई सरकार व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मध्ये सप्टेंबर, अॉक्टोबर १८५७ साली युध्द झाले. परिणामी झाशी राणीने ओरछा राणीचा पराभव केला.}

*राजा प्रतापसिंह बुंदेला (१८७४-१९३०)
*राजा वीर सिंह बुंदेला द्वितीय
(४ मार्च १९३०- १ जानेवारी १९५०)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काय मग कशी वाटली बाजीराव पेशव्यांची जहागीर.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
- इतिहासप्रेमी रितेश ठाकूर (जय महाराष्ट्र)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओरछा नगराची काही सुंदर छायाचित्रे..........

No comments:

Post a Comment